Fri, Dec 04, 2020 04:49होमपेज › Soneri › कुठलीही लक्षणे नसताना 'या' हॉलिवूड अभिनेत्याला कोरोनाची लागण 

कुठलीही लक्षणे नसताना 'या' हॉलिवूड अभिनेत्याला कोरोनाची लागण 

Published On: | Last Updated:
नवी दिल्ली :  पुढारी ऑनलाईन 

कोरोना विषाणूचा कहर जगभरात दिसत आहे. अनेक दिग्गज व्यक्तींनाही कोरोनाची लागण झाली आहे. आता हॉलिवूड अभिनेता इदरिस एल्बालादेखील कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे, त्याने आपल्याला कुठलेही लक्षण दिसत नसल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून एल्बाने ही माहिती दिली आहे. 

कोरोनामुळे अनेक हॉलिवूड चित्रपटांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. अनेक हॉलिवूड स्टार्सनादेखील विषाणूची लागण झाली आहे. आणि सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. टॉम हँक्सशिवाय बॉन्ड गर्ल अभिनेत्री ओल्गा कुरिलेन्कोलाही कोरोनाची लागण झाली आहे. 

आता इदरिस एल्बानेही सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून या गोष्टीची पुष्टी केली आहे की, त्याला कोरोनाची लागण झाली आहे. परंतु, त्याला कुठलेही लक्षण नाही आणि आता तो पूर्णपणे ठीक आहे. 

एल्बाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, 'आज सकाळी सकाळी मला समजलं की, मी Covid-19 पॉझिटिव्ह आहे.  मी आता ठिक आहे. आणि आता मला कोणतेही लक्षण दिसत नाही. मी आयसोलेट झालो आहे. सर्व लोकांनी घरी राहावे. तार्किक बना. घाबरण्याची गरज नाही. मी माझ्या आरोग्याबद्दल अपडेट देत राहीन.'