Sun, Oct 25, 2020 08:06होमपेज › National › काय आहे 'काळवीट शिकार प्रकरण'? 

काय आहे 'काळवीट शिकार प्रकरण'?

Published On: | Last Updated:
जोधपूर : पुढारी ऑनलाईन

जोधपूरमध्‍ये १९९८ रोजी 'हम साथ साथ है' चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. दरम्‍यान, चित्रपटातील स्‍टार्स म्‍हणजेच सलमान खान, सैफ अली, तब्‍बू, सोनाली बेंद्रे आणि निलम हे जंगलात गेले. तेथे सलमानने काळवीटांची शिकार केली. ही घटना १ आणि २ ऑक्‍टोबर १९९८ रोजी कांकाणी गावात घडली होती. दोन काळवीटांची शिकार केल्‍याचा आरोप सलमान खानवर होता. 

हे प्रकरण न्‍यायालयात गेलं. न्‍यायालयात साक्षीदारांनी सांगितलं की, त्‍यावेळी सलमान खान आणि इतर स्‍टार्स जिप्‍सी गाडीत होते. त्‍या स्‍टार्सनी सलमानला काळवीटची शिकार करण्‍यास सांगितले होते. यानंतर बंदुकीच्‍या गोळीचा आवाज ऐकून सर्व गावातले लोक एकत्र जमले होते. लोक तिथे आल्‍यावर सलमान गाडी घेऊन पळून गेला होता. दोन्‍हीही मृत काळवीट तेथेच पडले होते. 

सलमानविरोधात चार केसेस
सलमान खानविरोधात जोधपूरमध्‍ये चार प्रकरणे दाखल करण्‍यात आले होते. त्‍यातील तीन  प्रकरण हे काळवीटची शिकार केल्‍याप्रकरणी तर एक अवैध शस्‍त्र बाळगल्‍याप्रकरणी होतं. पैकी दोन केसमध्‍ये सलमानला न्‍यायालयाने शिक्षा सुनावली होती आणि सलमानला तुरुंगात जावं लागलं होतं. तर अवैध शस्‍त्र बाळगल्‍याप्रकरणी न्‍यायालयाने त्‍याची निर्दोष मुक्‍तता केली होती. उर्वरित एका केसमध्‍ये म्‍हणजेच दोन काळवीटांची शिकार केल्‍याप्रकरणी आज ५ एप्रिल रोजी जोधपूर न्‍यायालयाने सलमानला दोषी ठरवले. 

tags : Blackbuck poaching case , Salman Khan, rajasthan, jodhpur court 

 "