Mon, Sep 21, 2020 18:24होमपेज › Youthworld › #kissDay एक लव्हेबल किस पार्टनरसाठी!

#kissDay एक लव्हेबल किस पार्टनरसाठी!

Last Updated: Feb 13 2020 12:53PM
''इश्क पर जोर नहीं है ये वो आतिश 'ग़ालिब' 
कि लगाए न लगे और बुझाए न बने''
''इश्कने 'गालिब' निकम्मा कर दिया 
वर्ना हम भी आदमी थे काम के'' 

मिर्जा गालिब यांची शायरी एव्हरग्रीन आहे. अणि प्रेमवीरांमध्ये लोकप्रियदेखील आहे. प्रेम म्हटलं की, अनेकांच्या मनात प्रेमाच्या तारा छेडल्या जातात. मग त्यांना आठवते ती पार्टनरची पहिली भेट, पहिली मिठी आणि पहिलं किस. व्हॅलेंटाईन डे (१४ फेब्रुवारी) पूर्वी येतो तो किस डे. आपल्‍या पार्टनरच्‍या प्रति आपल्‍या भावना पोहोचवण्‍यासाठी एक 'किस' पुरेसं आहे. असं नाही की हे फक्‍त तुमच्‍या प्रेमाला दर्शवतं. तर किस एकमेकांशी जुळलेल्‍या भावनादेखील दर्शवतं. काही वेळा मैत्रीत रुसवे-फुगवे होतात. अशा वेळी मनधरणी करण्‍यासाठी एक किस पुरेसं आहे. आज १३ फेब्रुवारीला किस डे (चुंबन दिवस) आहे. पार्टनरच्‍या प्रती असलेलं प्रेम, भावना, व्‍यक्‍त करण्‍यासाठी आजचा हा दिवस अगदी खास आहे.

Image result for kiss day

अधिकतर कपल किस करून आपलं प्रेम दर्शवतात. किस विश्‍वास, आपुलकी आणि प्रेम दर्शवण्‍यासाठी या खास दिवसापेक्षा आणखी दुसरं काय हवयं? एका किसच्‍या माध्‍यमातून तुम्‍ही तुमच्‍या पार्टनरला खूप स्‍पेशल फिल देऊ शकता. तुम्हीही तुमच्या पार्टनरला कधी किस केलाय काय? 

Image result for kiss day

शब्दांविना प्रेम व्यक्त करायचं असेल तर एक लव्हेबल किस पुरेसं असतं. किस डे (Kiss Day) ची कपल्सना उत्सुकता लागून राहिलेली असते. हा खास दिवस स्पेशल बनवण्यासाठी कपल्स खूप सारी तयारी करतात. किस डेच्या दिवशी प्रेम  करणारे प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांना किस करून आपलं अतुट प्रेम व्यक्त करतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी किस सर्वात उत्तम माध्यम आहे. तेव्हा नातं खास होत जातं. जवळीकता वाढते आणि नातं विश्वासाच्या जोरावर पुढं जाऊ लागते. हेच कारण आहे की, या नात्यांमध्ये अधिक गोडवा भरण्यासाठी कपल्स व्हॅलेंटाईन वीकच्या सहाव्या दिवशी किस डे साजरा करतात. 

Image result for kiss lipstics

तुम्ही किसिंग डे ला आपली पत्‍नी वा गर्लफ्रेंडला एखादी भेटवस्‍तू देऊनही तिला खुश करू शकता. तर पती किंवा बॉयफ्रेंडला खास मॅसेज पाठवूनदेखील स्‍पेशल फिलिंग देऊ शकता. 

Image result for valentines day

'प्‍यार नहीं  तो क्‍या, जिंदगी मे तनहा रहकर क्‍या करोगे' 

किसिंग डे हे नाव ऐकताच प्रेम करणाऱ्यांचे हार्टबीट्‍स नक्‍कीच वाढतात. 'दिल मे कुछ कुछ होता है....' हे लव्‍ह एक्‍सप्रेशन असतं. तुमच्‍या भावना, प्रेम पोहोचवण्‍यासाठी आपल्या पार्टनरला तुम्ही एक किस देऊ शकता. पहिल्‍यांदा किस करताना आपला पार्टनर काय म्‍हणेल, त्‍यासाठी तयार होईल की नाही? असे ढिगभर विचार मनात असतात. काही वेळा सुरुवातीला संकोच होतं. तर ना-नको! चा सामनाही करावा लागतो. पहिल्‍यांदा किस करण खरचं आव्‍हानात्‍मक असतं. कारण, पार्टनरची रिॲक्‍शन कशी येईल, याबाबत अनभिज्ञ असतो किंवा त्याबद्दल काहीच माहिती नसतं.

Image result for rose

हे महत्त्‍वाचं नाही की, तुम्‍ही पहिल्‍यांदाच किस करत आहात किंवा अनेकवेळा केलं आहे. महत्त्‍वाचं हे आहे की, तुम्‍ही लव्‍ह बाईट किस करू शकता की नाही? पहिलं किस आपल्‍या पार्टनरला दिवस-रात्र आपल्‍याबद्‍दल विचार करण्‍यास भाग पाडतं. कारण, हे कायम स्‍मरणात राहणार असतं. तर मग, आपल्या खास अंदाजात किसींग डे साजरा करा... 

'किसी भी मिस को तब तक किस न करो जब तक मिस आपको किस न करे, 
अगर मिस आपको किस करे, तो उसे इतनी किस करो कि वो किसी और को मिस न करें'

 

- स्वालिया शिकलगार 

 "