Sat, Oct 24, 2020 08:05होमपेज › Youthworld › कलेसाठी एक पाऊल पुढे! मदतीचे आवाहन

कलेसाठी एक पाऊल पुढे! मदतीचे आवाहन

Last Updated: Sep 21 2020 11:56AM
कोल्हापूर :

कोल्हापूरला कलापूर म्हणून जागतिक नकाशावर घेऊन जायचे छत्रपती शाहू महाराजांचे स्वप्न भवानी सामाजिक संस्थेला पूर्ण करायचे आहे. मराठी मातीची जाण आणि ओळख रोमारोमांत भिनलेले कोल्हापूर कायमच कला, साहित्य, चित्रपट या क्षेत्रांमध्ये अग्रेसर राहिलेले आहे. भारताला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानू अथय्या असो किंवा जगाला वास्तववादी चित्रपटांची ओळख करून देणाऱ्या तांबडी माती यासारख्या कलाकृती या कोल्हापूरच्या मातीने जगाला दिलेल्या आहेत. अलीकडच्या काळामध्ये कोल्हापूरची आणि महाराष्ट्रातील मराठी कलावंतांची परिस्थिती खालावलेली दिसते. कला क्षेत्राला बऱ्याच बदलांना समोर जावं लागत आहेत. मग यासाठी काय करता येईल असा प्रश्न चिंतेचा आणि चिंतनाचा होता. 

आपल्या मातीचे सुपुत्र डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि यांच्या सोबतच काही विशेषज्ज्ञ लोकांशी चर्चा करून भवानी सामाजिक संस्थेने ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनच्या चांगुलपणाच्या चळवळी बरोबर एक उपक्रम राबिवण्याचे ठरवले आहे. याच्या पहिल्या टप्यात, कोल्हापूर, महाराष्ट्र आणि देशातील कला क्षेत्रात पूर्ण वेळ काम करत असलेल्या कलाकारांना एकत्र घेऊन एक नेटवर्क तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. कलाकार श्रोत्यांशिवाय अपूर्ण असतो म्हणून त्यांची कला आणि प्रतिभा प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचं काम, विविध ऑनलाईन आणि हळूहळू ऑफलाईन प्रदर्शने आणि इतर बरेच उपक्रम, baramati.org या website द्वारे ही संस्था करणार आहे. त्याचबरोबर कलाकारांसाठी उपलब्ध असलेल्या स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील, सरकारी तसेच बिगर सरकारी योजना, शिष्यवृत्त्या, फेलोशिप आपल्या मराठी कलाकारांपर्यंत पोहोचवणे; त्यासाठी त्यांना अर्ज करण्यासाठी मदत करण्याचे काम या संस्थेमार्फत आणि मुळे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या गिविंग बॅक मिशनतर्फे करणार आहोत. 

baramati.org एक सामाजिक उपक्रम म्हणून उभी राहत आहे. Crowdfunding द्वारे एक फंड गोळा करून त्या देणगी मिळालेल्या रकमेमधून प्रतिभावंत कलाकारांच्या कलाकृतीचा संग्रह करण्यास सुरुवात झाली आहे. यातून कलाकारांना आणि त्यांच्या कलेला योग्य आर्थिक मोबदला मिळावा आणि त्यांची कला सन्मानाने रसिकांपर्यंत जाऊ शकते. दीर्घावधीमध्ये या संग्रहासाठी पन्हाळा येथे आपली खासगी जागा सुद्धा या उपक्रमासाठी सौ. सुमन साळोखे (अध्यक्षा - भवानी सामाजिक संस्था) यांनी उपलब्ध करून द्यायचे ठरवले आहे. 

कलाकार हा त्याच्या प्रेक्षकांशिवाय अपुरा असतो. आज कलेला लोकाश्रयाची गरज आहे. म्हणूनच आम्ही सध्या सुरू केलेल्या funding campaign ला आर्थिक देणगी देऊन आपल्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरला, कलापूर म्हणून परत नावलौकिक मिळवण्यासाठी सहभागी व्हा! आपल्या वाचकांमधील १ लाख लोकांनी १०० रुपये इतकी जरी देणगी दिली तरी हा उपक्रम मोठ्या पातळीवर नेण्यासाठी आपली मदत प्रचंड मोलाची ठरेल. 

Baramati.org एक सेवाभावी संस्था आहे, आणि याचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. हे campaign milaap.org वर verified म्हणजेच अधिकृत आहे. खाली दिलेल्या upi id वर googlePay किंवा PhonePe द्वारे तुम्ही ऐच्छिक रकम पाठवू शकता. खाली दिलेल्या खात्यावर पण तुम्ही देणगी जमा करू शकता.

Virtual account name: artist with their livelihood - Milaap, Account number: 2223330083979761, IFSC code: RATN0VAAPIS, Bank name: RBL. या उपक्रमाशी संबंधित सर्व माहिती आम्ही Baramati.rg या संकेतस्थळावर पाहता येईल.
 

 "