कविता : वैद्यक सार

Last Updated: Apr 09 2020 3:26PM
Responsive image

कोरोना रुग्णांच्यावर अत्यंत संयमाने डॉक्टर उपचार करत आहेत. असे रुग्ण हाताळणे धोकादायक तसेच जिकीरीचे काम आहे. मात्र कर्तव्य भावनेने डॉक्टर हे काम अत्यंत सचोटीने करत आहेत. औरंगाबादच्या त्यातीलच एका डॉक्टरने काव्यातून आपल्या वैद्यकीय व्यवसायाचे तसेच शिक्षणाचे गमक उलगडले आहे. त्यांची ही कविता. खास पुढारीच्या वाचकांसाठी...


अस्तित्व ज्ञात होम हवनांचे 
बोलके उदाहरण कवित्वाचे 
चारदिशी वर्तावी तुझी महती 
सार्थ जगी काव्योपचार पद्धती
प्राचीन काळी इजिप्त जमाती 
शब्द कविता पेयजली पाजती 
रोमन वैद्यकतज्ञ सोरानसने 
दिधले उपचार काव्यलेखने
अमेरिकी स्थापली बिब्लीओथेरपी 
साहित्यिक उपचार बेंजामीनप्रती 
राबविली जागोजागी काव्यमोहीम 
ग्राईफरने आयुष्य वेचून अप्रतिम 
सुखदुःखातून तुझी निर्मिती 
निकोप मानसिक वृद्धी दात्री 
दाटलेला तीव्र भावनिक निचरा 
काव्यरूप त्यातून येई आकारा ...

- डॉ. अर्चना पाटील 
(अबोली)

बीड : गोकुळाष्टमीच्या उपवासाच्या भगरीतून शंभर जाणांना विषबाधा


जळगाव जिल्ह्याने दुसऱ्या दिवशीही केला ५०० रुग्णांचा आकडा पार


कोल्हापूर: वैरण आणण्यासाठी गेलल्या शेतकऱ्याचा पुरात बुडून मृत्यू  


औरंगाबादेत बाटली फिरवून अँटिबॉडीज चाचणी 


नवी मुंबईत फोर्टीज हॉस्पिटलची रूग्णाच्या नातेवाईकांनी केली तोडफोड


बीड : केज तालुक्यात अवैध वाळू माफियांची मुजोरी वाढली


सांगली : लांडग्याच्या हल्ल्यात दहा मेंढ्या ठार


महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी सरचिटणीस एन. एस. प्रभू यांचे निधन


'असीम' ऑनलाईन पोर्टलवर बेरोजगारांची भिस्त!


अल्पवयीन पुतणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रीत करणाऱ्या चुलतीला पोलिस कोठडी