Tue, Sep 22, 2020 06:02होमपेज › Youthworld › खुशखबर! व्हॉट्सॲपवरून डिलीट झालेले फोटो 'असे' परत मिळवता येणार

खुशखबर! व्हॉट्सॲपवरून डिलीट झालेले फोटो 'असे' परत मिळवता येणार

Last Updated: Jun 24 2020 4:18PM
नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

तरूणांसह अबालवृद्धांपर्यंत लोकप्रिय असणाऱ्या व्हॉट्सॲपवरून युर्स आता ३० दिवसाच्या कालावधीतील डाटा परत मिळवू शकतो. जर कोणा युजर्सच्या व्हॉट्सअपवरून फोटो किंवा व्हिडिओ डिलीट झाला असेल तर तो युजर पुन्हा ते फोटो डाऊनलोड करू शकतो. खरतर, ३० दिवसांपेक्षा जास्त काळानंतर, फोटो आणि व्हिडिओ डाऊनलोड झाल्यानंतर व्हॉट्सअॅपच्या प्लॅटफॉर्मवरून हटविले जातात आणि ते पुन्हा डाउनलोड करता येत नाही. मात्र, यामध्ये बदल झाला असून युजर पुन्हा ते फोटो, व्हिडिओ डाऊनलोड करू शकणार आहेत. 

ॲड्रॉइड युजर्सला व्हॉट्स ॲपवरील फोटो, व्हिडिओ आणि इतर लागणाऱ्या गोष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी एक सोपा पर्याय आहे. डीफॉल्टनुसार सर्व ॲड्रॉइड फोन जी मेल खात्याशी जोडलेले आहेत. लिंक्ड जीमेल खात्याच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅप डेटा सुरक्षित ठेवता येतो. युजर्स अ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन गुगल ड्राइव्हवरील डेटा बॅकअप घेऊ शकतात आणि नंतर तो इतर कोणत्याही डिव्हाइसवर पुन्हा अपलोड करू शकतात. 

अशाप्रकारे फोटो डाऊनलोड करा

व्हाट्सॲपवरून युजर त्याच फाईल्स डाऊनलोड करू शकतो ज्या डिलीट केलेल्या नाहीत. जर संपूर्ण डाटा व्हाट्सॲपवरून हटवला असल्यास तो डाटा युजर पुन्हा पाहु शकत नाही. जर तसे नसेल तर व्हॉट्स अॅप आणि चॅट्स ओपन करा यानंतर जी फाईल हवी त्या फाईलपर्यंत स्क्रोल करा जर ती फाईल अस्पष्ट दिसत असेल तर त्यावर टॅप करा आणि ती फाईल पुन्हा डाऊनलोड करा. मात्र, फाईल एकदा रिसीव झाल्यानंतर ३० दिवसानंतर पुन्हा डाऊनलोड करता येणार नाही. 

एरर मेसेज दिसले तर काय कराल? 

अनेकवेळा व्हॉट्सॲपवील मेसेज एरर दिसतात आणि स्क्रीनवर  'can't download, please ask that it be resent to you?' असा मेसेज येतो. असे झाले तर सर्वात पहिला इंटरनेट कनेक्शन ॲक्टिव्ह आहे की नाही ते तपासा. तसेच, जर फोनमधील वेळ आणि तारीखेत बदल झाला असल्यास व्हॉट्सॲप सर्व्हरला कनेक्ट होत नाही. तसेच, फोनमधील  स्टोरेज स्पेसमध्ये जागा नसल्यासदेखील व्हॉट्सअप एरर असे येते.  

 "