Tue, Jun 15, 2021 13:06होमपेज › Youthworld › सिंगल-मिंगलचा झोल

सिंगल-मिंगलचा झोल

Last Updated: Nov 11 2019 2:42PM

#SinglesDay,  #HappySinglesDay
सीमा पाटील : पुढारी ऑनलाईन

वयात मुलं आली की,  आई-वडिलांना वेध लागतात ते त्यांचे दोनाचे-चार हात करण्याचे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता दोनाचे चार-हात करणे अवघड बनले आहे. देशातील मुलींची संख्या पाहता नवऱ्याला नवरी मिळणे ही तारेवरची कसरत झाली आहेच. पण मुलीसाठीही योग्य नवरा शोधणे कठीण झाले आहे. कारण बहुतांश मुलींच्या अपेक्षा पाहता आई-वडिलांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशी परिस्थिती जगभरात निर्माण झाली आहे. यासर्व चिंताजनक परिस्थितीमुळे आजची बहुतांशी तरुणाई या सिंगल-मिंगलच्‍या झोलमध्‍ये अडकलेली पाहायला मिळत आहे. या सर्वातच आज सोशल मीडियावर #SinglesDay,  #HappySinglesDay ट्रेंड जोरात सुरू आहे. 

रे 'सिंगल' असल्याचे टेंशन आहे, 'मिंगल'झालो तर लाईफ सेट होईल. असे आपण बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकत असतो. पण सिंगल असला म्हणून काय झालं... इस टेन्शन को मारो गोली...आज जागतिक 'सिंगल डे'निमित्त 'सिंगल डे'विषयी...थोडसं.....

'सिंगल डे'ची सुरुवात coolcool

चीनमध्‍ये ११ नोव्‍हेंबर २००९ साली अविवाहित लोकांसाठी सिंगल डे साजरा करण्‍याची सुरुवात झाली. यादिवसाच्‍या निमित्ताने लोक आपल्‍या नात्‍याला वेळ देतात आणि दिवस सेलिब्रेट करतात. २०११ मध्‍ये बीजिंग मध्‍ये ४,००० जोड्‍या लग्‍नाच्‍या बंधनात अडकल्‍या होत्‍या. तसे पाहिले तर चीनमध्‍ये सामन्‍यतः या एका दिवसात सरासरी  ७०० लग्‍नं होत असतात. आता मात्र हा दिवस जगभरासाठी एक ऑफलाईन आणि ऑनलाईन शॉपिंग फेस्‍टिवल बनला आहे. यादिवसानित्त जगभरात ई-कॉमर्स कंपन्‍या ऑनलाईन 'सिंगल डे सेल'  फेस्‍टिवलचे आयोजन करतात. 

११ तारीखच का ? surprisesurprise

आजची तारीख ११-११ अशी आहे. आजच्‍या दिवशीच म्‍हणजेच ११ तारखेलाच  का साजरा केला जातो सिंगल डे?  तर यापाठीमागे एक कारण आहे. '१' नंबर नेहमीच सिंगल म्‍हणजेच अविवाहित लोकांचे प्रतिनिधित्‍व करतो. यासाठीच ११ नोव्‍हेंबरला सिंगल दिवस साजरा केला जातो. तसेच यामध्‍ये ११-११ असे चारवेळा येते.  म्‍हणजे सिंगलचे मिंगल होणे. येथे मराठीतील दोनाचे-चार हात होणे ही मराठी म्‍हण लागू  पडते. लग्‍नानंतर दोन व्‍यक्‍ती एकत्र येत असतात म्‍हणजेच दोघे मनाने एक होत असतात. 

सिंगल राहणे सौभाग्‍य की दुर्भाग्‍य?smileycrying

सिंगल राहणे सौभाग्‍य की दुर्भाग्‍य या समस्‍येत आजची काहीअंशी तरुणाई गुरफटलेली दिसते. सिंगल राहण्‍याकडे एक समस्‍या म्‍हणून नाही तर  सौभाग्‍य म्‍हणून पाहिले पाहिजे. कारण सिंगल असण्‍याचा आनंद काही वेगळाचा असतो. त्यामुळे  चिंता करण्‍यापेक्षा त्‍याचा आनंद घेतला पाहिजे. कारण जन्‍माला येताना आणि जाताना माणूस एकटाच असतो याचा अर्थ त्यावेळी तो सिंगल असतो हे तितकेच खरे आहे. त्‍यामुळे सिंगल असण्‍याकडे समस्‍या म्‍हणून न पाहता आनंद म्‍हणून पाहणे गरजेचे आहे. गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड नाही म्‍हणून कोण टर उडवत असेल तर ते मनावर न घेता स्वतःच्या जीवनात आनंद शोधण्‍याचा प्रयत्‍न करा.गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड नाही म्‍हणून कोण टर उडवत असेल तर ते मनावर न घेता स्वतःच्या जीवनात आपण किती आनंदी हे दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्‍येक जण तसा एकाटच असतो मग त्‍यासाठी चिंता कशाला करायची. त्यामुळे सिंगल असण्‍याकडे सकारात्‍मकतेच्‍या दृष्‍टीने पाहायला शिका.

सिंगल-मिंगल झोलblushangel

सिंगल असल्‍यावर सर्वच जण मिंगल होण्‍याच्या विचारात असतात. मात्र सिंगल असल्‍याचा आनंद वेगळाच असतो. कारण सिंगल असल्‍यावर स्‍वत:ची स्‍पेस  मिळते, म्‍हणजेच स्‍वत:ला ओळखता येते. सिंगल असल्‍यामुळे स्‍वत:वर प्रेम करायला माणूस शिकतो. प्रेमाचे हेच गणित जगणे सुंदर बनवायला मदत करते.   

लग्‍नानंतर किंवा एखाद्यामध्ये गुंतल्यावर बर्‍याच जबाबदार्‍या येत असतात. अशावेळी आपण काही प्रमाणात का होईना स्‍वत:कडे दुर्लक्ष करतो. त्‍यावेळी खऱ्या अर्थाने 'सिंगल'चा अर्थ समजतो. मिंगल असणार्‍यांना काहीवेळेस वाटते की आपण सिंगल राहावे. मिंगल लोकांना सिंगल राहून स्‍वत:च्‍या आवडी- निवडी जोपाता येतात हेही तितकेच खरे आहे. शेवटी काय  सिंगल-मिंगल  या झोलमध्‍ये अडकू नका. सिंगल असण्‍याकडे 'अच्‍छे दिन' म्‍हणून पाहा. सिंगल  काय आणि  मिंगल काय..आयुष्‍य खुप सुंदर आहे ते आनंदी जगायला शिका.....heartheartheart