Sun, Sep 27, 2020 03:53होमपेज › Vishwasanchar › दीपिकाने केले रणवीरला ‘एक्स्पोज’!

दीपिकाने केले रणवीरला ‘एक्स्पोज’!

Last Updated: May 27 2020 9:21PM
मुंबई :

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे बॉलीवूडमधील एक लाडकं जोडपं आहे. दोघेही एकमेकांबाबत गोड गोड पोस्ट शेअर करीत असतात आणि नव्या नवलाईचा संसार सुरू असताना जी गोड ‘तू तू मैं मैं’ होत असते ती सुद्धा हे दोघे सोशल मीडियात शेअर करीत असत. आताही त्यांच्या अशाच ‘तू तू मैं मैं’चा व्हिडीओ समोर आला आहे. नुकतेच फुटबॉलर सुनील छेत्री यांनी त्यांच्या ‘इलेव्हन ऑन टेन’ या शोमध्ये रणवीर सिंहबरोबर गप्पा मारल्या. त्यावेळी रणवीरबरोबरच्या बॅडमिंटन खेळातील कौशल्याबाबतची माहिती दीपिकाने सुनील यांना सांगितल्याचे समजताच त्याने ‘तूम मुझे एक्स्पोज कर रही हो...’ असे म्हणून दीपिकाला दटावले!

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. या चॅट शोमध्ये रणवीरच्या खासगी जीवनातील काही किस्से सुनील यांनी सर्वांसमोर सांगितले. त्यांना हे किस्से कसे समजले याचे रणवीरला आश्‍चर्य वाटले आणि हे सर्व दीपिकानेच त्यांना सांगितल्याचे त्याच्या लगेचच लक्षात आले. त्यावर त्याने लगेचच ‘बेबी...’

 म्हणून दीपिकाला हाक मारली आणि ‘तू मला सर्वांसमोर एक्स्पोज करीत आहेस!’ असे म्हटले. त्यावर दीपिकाने स्क्रिनसमोर हात घेऊन ‘छान...असेच करा!’ अशा अर्थाची खूण केली. सुनील यांनी यावेळी म्हटले होते की ‘मी असे ऐकले आहे की तू दीपिकासोबत बॅडमिंटन खेळताना केवळ तीन पॉईंट मिळवले होतेस. ते तीन पॉईंटही तू प्रकाश पदुकोण यांचा जावई असल्यामुळे मिळाले आहेत!’

 "