Tue, Sep 17, 2019 07:55होमपेज › Vishwasanchar › वयाच्या 52 व्या वर्षी माधुरीची अदा!

वयाच्या 52 व्या वर्षी माधुरीची अदा!

Published On: Sep 12 2019 1:45AM | Last Updated: Sep 11 2019 9:16PM

सौंदर्यसम्राज्ञी माधुरी दीक्षितमुंबई :

सौंदर्यसम्राज्ञी माधुरी दीक्षित वयाच्या 52 व्या वर्षीही आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करीत आहे. नुकतेच ‘आयफा’च्या पत्रकार परिषदेवेळी ती वाईन रेड रंगाचा स्ट्रॅपी शिमरी ड्रेस परिधान करून आली आणि सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या. या कार्यक्रमात कॅटरिना कैफही होती; पण भाव खाऊन गेली 52 वर्षांची माधुरी!

माधुरीचे सौंदर्य पारंपरिक साडी, लेहंगा किंवा सलवार-कमीजमध्ये जसे खुलते तसेच ते पाश्‍चात्त्य धाटणीच्या पोषाखातही खुलते हे विशेष. ‘मिलियन डॉलर’ स्माईल असलेल्या माधुरीच्या सुंदर हास्यावर आजही रसिक फिदा आहेत. वयाची पन्‍नाशी ओलांडली असली तरी माधुरीने आपले सौंदर्य अबाधितच ठेवले आहे. त्याची प्रचिती या कार्यक्रमावेळी आली. फॅशन डिझायनर सुनैना खेरा यांनी डिझाईन केलेला सुंदर पोषाख परिधान करून आलेल्या माधुरीवरच सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या. साधाच मेकअप केलेली माधुरी या सुंदर पोषाखात खुलून दिसत होती. या कार्यक्रमात सलमान खान आणि कॅटरिना कैफही होते. मात्र, माधुरीच्या देदीप्यमान सौंदर्याने ते झाकोळून गेले! 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex