Wed, Aug 12, 2020 20:58होमपेज › Vishwasanchar › कृती वाढवणार वजन!

कृती वाढवणार वजन!

Last Updated: Jan 14 2020 10:25PM
मुंबई ः ‘हिरोपंती’ मधून पदार्पण केलेली कृती सेनन आपल्या कारकिर्दीत प्रथमच एक वेगळी भूमिका साकारणार आहे. नेहमी चवळीच्या शेंगेसारखी शिडशिडीत आणि उंच दिसणारी कृती आता आगामी ‘मिमी’साठी पंधरा किलो वजन वाढवणार आहे. या चित्रपटात ती सरोगेट मदरची भूमिका करणार आहे. 

याबाबत कृतीने सांगितले, माझ्यासाठी इतके वजन वाढवणे हे आव्हानात्मकच आहे. माझ्या शरीरासाठी हे नवे आहे. मात्र, या बदलाबाबत मी उत्साहित आहे. ही भूमिका माझ्या हृदयाच्या जवळ आहे आणि या भूमिकेसाठी मी माझे पूर्ण योगदान देऊ इच्छिते. ही भूमिका साकारत असतानाच्या काळात मी अन्य कोणतेही काम न घेण्याचा निर्णयही घेतलेला आहे. या भूमिकेसाठी कृतीने हेवी डाएट घेणे सुरू केले आहे. अधिक प्रमाणात कार्ब आणि फॅटचे सेवन ती सध्या करीत आहे. त्यासाठी तिने आहारात पनीर, मिठाई, तूप, जंक फूड, तळलेले पदार्थ, बटाटे आणि रताळे यांचा समावेश केला आहे. कधी कधी तर भूक नसली तरीही ती काहीबाही खात आहे. या भूमिकेने तिला काहीही खाण्याची मूभा दिली असल्याने त्याचा ती आनंदही लुटत आहे!