Tue, Jul 14, 2020 13:14होमपेज › Vishwasanchar › वापरलेल्या मास्कपासून बनणार पीपीई मटेरियल

वापरलेल्या मास्कपासून बनणार पीपीई मटेरियल

Last Updated: Jun 29 2020 8:14AM
रायपूर 

कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वप्रथम मास्कला प्राधान्य दिले जाते. वापरल्यानंतर हे मास्क फेकून दिले जातात; मात्र हेच वापरलेले मास्क उच्च तापमानात निर्जंतुक करून त्यांचे पीपीई मटेरियलमध्ये लवकरच रूपांतर करता येणार आहे. ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया करणारी मशिन लवकरच विकसित केली जाणार आहे. यासाठी ‘एनआईटी’ रायपूरमध्ये यासाठी जोरदार  प्रयत्न सुरू आहेत.

वापरण्यात आलेले मास्क कचर्‍यात फेकून दिले जातात. यामुळे या मास्कचा निपटारा कसा करावयाचा, हा मोठा प्रश्‍न तमाम देशांसमोर निर्माण झाला आहे. कारण, कोरोनामुळे जगभरातील स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनू लागली आहे. यामुळे मास्कचा वापरही कित्येक पटीने वाढला आहे. कोरोनामुळे सामान्य जनतेमधून मास्कचा तर आरोग्य कर्मचारी वर्गातून पर्सनल प्रोटेक्शन किटची (पीपीई) मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मात्र, हे साहित्य वापरल्यानंतर टाकून दिले जाते म्हणजेच त्याचा पुन्हा वापर करता येत नाही.

वरील समस्या नजरेसमोर ठेवून शास्त्रीय पद्धतीने एन-95 अथवा याचप्रकारच्या साहित्याचे रिसायकलिंग करून त्याचे पीपीई मटेरियलमध्ये रूपांतर करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. जेणेकरून मास्क फेकल्याने धोकादायक कचराही तयार होणार नाही आणि अशा साहित्याचा वापर करून कमी खर्चात पीपीई मटेरियल तयार करता येईल. या दिशेने छत्तीसगडमधील एनआयटीने पाऊल टाकताना मशिन तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.