Sat, Oct 31, 2020 11:00होमपेज › Vishwasanchar › चिकन सूप पिल्यावर पोटात झाला ‘स्फोट’!

चिकन सूप पिल्यावर पोटात झाला ‘स्फोट’!

Last Updated: Sep 08 2020 8:10AM
सिडनी : जहाल तिखट मिरची खाऊन दाखवण्याच्या नादात एका व्यक्तीच्या पोटात ‘स्फोट’ झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. आता एका हॉटेलमध्ये चिकन सूप पिल्यावर महिलेच्या पोटात ‘स्फोट’ झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ऑस्ट्रेलियात काही वर्षांपूर्वी हा प्रकार घडला होता व आता पुन्हा एकदा त्याची चर्चा सुरू आहे.

रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या महिलेने ऑर्डर दिली आणि तिला अचानक उचक्या सुरू झाल्या. काही केल्या या उचक्या थांबेनात! पाणी, साखर घेऊन व श्वास रोखणे वगैरे प्रकार करूनही या उचक्या थांबेनात. अशा वेळी तेथील शेफने रेमेडीच्या नावाखाली व्हिनेगारऐवजी गडबडीत चुकून ओव्हन क्लिनर दिले आणि घात झाला! त्यानंतर महिलेने ऑर्डरप्रमाणे आलेले पदार्थ सेवन करण्यास सुरुवात केली. तिने चिकन सूप घेताच पोटात स्फोट झाला. ही घटना सात वर्षांपूर्वी म्हणजे 2013 मध्ये घडली व अजूनही तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिलेच्या पोटात व्हिनेगारऐवजी अ‍ॅसिड गेल्याचे दिसून आले. तिने रेस्टॉरंटकडे 36 कोटी 25 हजारांची नुकसानभरपाई देण्यासाठी दावा केला आहे. अनेक शस्त्रक्रियांनंतर रोज तीन इंजेक्शनवर ही महिला सध्या दिवस काढते आहे!
 

 "