Tue, Jul 14, 2020 12:28होमपेज › Vishwasanchar › ‘तिच्या’ शरीरात दोन गर्भाशय, दोन्हीमध्ये वाढताहेत जुळे भ्रूण !

‘तिच्या’ शरीरात दोन गर्भाशय, दोन्हीमध्ये वाढताहेत जुळे भ्रूण !

Last Updated: Jun 30 2020 8:12AM
लंडन : पुढारी वृत्तसेवा

ब्रिटनमधील एका महिलेच्या शरीरात दोन गर्भाशय आहेत. या दोन्ही गर्भाशयांमध्ये दोन-दोन बाळं विकसित होत आहेत. 28 वर्षांच्या केली फेयरहर्स्ट या महिलेने सोनोग्राफी केल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली. डॉक्टरांनी म्हटले आहे की पाच कोटीत एखादे उदाहरण असे असते. दोन्ही गर्भाशयांमध्ये जुळी मुलं असण्याचा हा प्रकार अत्यंत दुर्मीळ आहे.

या महिलेला एकदा नव्हे तर दोनवेळा प्रसूती वेदना सहन कराव्या लागू शकतात. या बाळांचा मुदतीपूर्वीच जन्म होऊ शकतो. विशेष म्हणजे केली यापूर्वी दोन अपत्यांची आई बनलेली आहे. तिच्या एका मुलीचे वय चार वर्षे तर दुसरीचे तीन वर्षे आहे. या दोघींचाही जन्म मुदतीपूर्वीच झालेला आहे. केलीच्या कुटुंबात जुळ्या-तिळ्यांची परंपरा आहे. तिच्या आईचे वडीलही तिळ्यांपैकी एक होते. लंडनच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. आसमा खलिल यांनी सांगितले की दोन गर्भाशय असण्याच्या स्थितीला ‘यूट्रस डायडेल्फिस’ असे म्हटले जाते. अशी स्थिती जन्मजातच असते. ज्यावेळी एखाद्या महिलेची यूट्रस दोन छोट्या ट्यूबमध्ये विभागली जाते त्यावेळी अशी स्थिती बनते.