Sun, Sep 20, 2020 06:17होमपेज › Vidarbha › सोनोग्राफी केंद्राबाहेरच बाकावर महिलेची प्रसूती

सोनोग्राफी केंद्राबाहेरच बाकावर महिलेची प्रसूती

Last Updated: Aug 07 2020 2:24PM
बुलडाणा : पुढारी वृत्तसेवा 

सोनोग्राफी करण्यासाठी आलेल्या गर्भवती महिलेची केंद्राबाहेरच बाकावर प्रसूती झाल्याची घटना बुलडाणा शहरातील एका सोनोग्राफी केंद्रावर घडली. त्यामुळे केंद्राबाहेर एकच खळबळ उडाली.  

याबाबत मिळालेली माहिती अशी की, देऊळघाट येथील नऊ महिन्याची गर्भवती महिला तिच्या आईसोबत गुरूवारी दुपारी शहरातील डॉ. हरकूट यांचेकडे सोनोग्राफी करण्यासाठी आली होती. सोनोग्राफी झाल्यानंतर तेथून बाहेर पडताच गर्भवतीला तीव्र प्रसवकळा आल्याने तिने प्रांगणातील एका बाकावरच गोंडस मुलीला जन्म दिला. अचानकपणे खुल्यावर झालेल्या या प्रसूतीने दोघी मायलेकी प्रचंड गोंधळून व घाबरून गेल्या. तेथे हजर असलेल्या अन्य महिलांनी प्रसंगावधान दाखवत कापडाचा आडोसा करून बाकावर प्रसूती केली. विशेष म्हणजे नवजात बाळ बाळंतीण सुखरूप आहे.

 "