Fri, Jul 10, 2020 01:45होमपेज › Vidarbha › जळगाव : विहिरीत अंघोळ केल्याने दोन दलित युवकांना मारहाण

धक्कादायक; विहिरीत पोहल्याने दलित युवकांना विवस्त्रावस्थेत मारहाण

Published On: Jun 14 2018 7:45PM | Last Updated: Jun 14 2018 7:45PMजळगाव : प्रतिनिधी

पोहण्याच्या कारणावरुन दोन मातंग समाजाच्या दोन युवकांना नागवे करून जबर मारहाण करण्यात आली. संबंधित या प्रकरणातील युवकांना मारहाण करून त्यांनी त्‍या युवकांची धिंड काढली आहे. ही धक्कादायक घटना वाकडी गावातील मराठी शाळेजवळ कर्णफाट्यावर रविवारी सकाळी दहा वाजता घडली आहे. बूधवारी मध्यरात्री संबंधीत दोघांविरोधात पहूर पोलीसात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आजच्या पुरोगामी महाराष्ट्रात या प्रकारच्या घटना घडत असल्याने तीव्र संताप व्‍यक्‍त करण्यात येत आहे. 

पोलीसांच्या  माहितीनुसार  वाकडी (ता.जामनेर) येथील रहिवासी मांतग समाजाचे दूर्गाबाई सांडू चांदणे यांचा मुलगा सचिन चांदणे व पुतण्या राहूल चांदणे हे रविवारी पोहण्यासाठी ईश्वर बळवंत जोशी (भटके जोशी) यांच्या शेतातील विहीरीवर गेले होते. या क्षुल्‍लक कारणावरून ईश्वर बळवंत जोशी व प्रल्हाद उर्फ सोन्या लोहार या दोघांनी सचिन व राहूल यांच्या अंगावरील कपडे काढून मारहाण करून मुलांची नग्न धिेंड काढली. दोघांना पट्ट्याने मारहाण करण्यात आली. यावेळी त्यांना जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आली. या घटनेची कुठे वाच्यता केल्यास मारहाण करण्याची धमकी देण्यात आली. 

या घटनेचा बुधवारी व्‍हिडिओ व्‍हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली. यानंतर दूर्गाबाई सांडू चांदणे यांच्या तक्रारीनंतर प्रल्हाद उर्फ सोन्या लोहार व ईश्वर बळवंत जोशी यांच्या विरोधात ॲट्रोसिटीचा गुन्‍हा दाखल करण्यात आला. दोघांना अटक करण्यात आाली आहे. या घटनेची तपास पाचोरा विभागाचे डीवायएसपी केशवराव पातोंड करीत आहेत. 

घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. संबंधित समाजकंटकांर कायदेशीररित्या कारवाई केली असून कसून चौकशी केली जात आहे. कठोरातील कठोर शिक्षा शिक्षादिली जाईल. जेणे करून समाजात असे क्रूत्य पून्हा करण्याची हिम्मत कोणी करणार नाही. फिर्यादींनी बुधवारी संध्याकाळी वर्दी दिली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सपोनि मोहन बोरसे यांनी दिली.