Sat, Sep 19, 2020 17:49होमपेज › Vidarbha › यवतमाळ : आणखी २ पॉझिटिव्ह; रूग्‍ण संख्या १६ वर 

यवतमाळ : आणखी २ पॉझिटिव्ह; रूग्‍ण संख्या १६ वर 

Last Updated: May 22 2020 5:56PM
यवतमाळ : पुढारी वृत्‍तसेवा 

गत काही दिवसांपासून संस्थात्मक विलागिकरण कक्षात भरती असलेल्या दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. हे दोन्ही रूग्ण यवतमाळ शहरातील इंदिरा नगर येथील असून, ते इंदिरा नगरातील पॉझिटिव्ह रूग्णांच्या निकटच्या संपर्कातील आहेत. त्यांना आता आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यामुळे कालच्या (दि.21) रूग्णसंख्येत दोनने वाढ होऊन ही संख्या 17 वर गेली होती. मात्र 14 दिवसांच्या उपचारानंतर पॉझिटिव्ह असलेला एक रूग्ण पूर्ण बरा झाल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 16 इतकी झाली आहे. 

आयसोलेशन वॉर्डमध्ये सद्यस्थितीत 22 जण भरती आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 112 झाली असून, यापैकी 96 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 25 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 1887 नमुने पाठविण्यात आले असून, यापैकी 1862 नमुने प्राप्त तर 25 नमुने अप्राप्त आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 1750 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 16 जण तर गृह विलगीकरणात 484 जण आहेत. 

 "