Connection Error तीन युवा शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा प्रयत्न | पुढारी 
Sun, Jul 12, 2020 19:07होमपेज › Vidarbha › तीन युवा शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

तीन युवा शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: Feb 05 2018 8:14PM | Last Updated: Feb 05 2018 8:12PMनागपूर : प्रतिनिधी

शेतीतील उभा असलेला ऊस कारखान्याला देण्यासाठी ऊस वाहतुकीसाठी रस्ता देण्यात यावा, असा आदेश तहसील कार्यालयातून पारित झाला असतानाही गैरअर्जदार शेतकर्‍यांनी अडवणूक केल्याने त्रस्त झालेल्या तीन सख्ख्या भावांनी उमरखेड पोलिस ठाण्यात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिसांनी तत्परता दाखविल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे मात्र पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून 16 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. रविवारी अचानकपणे पोलिस ठाण्याच्या आवारात चुरमुरा (ता. उमरखेड) येथील प्रवीण रामजी पवार, दीपक रामजी पवार, राहुल रामजी पवार हे तिघे सख्ख्येभाऊ (शेतकरी) हातात रॉकेलचा डबा घेऊन पोहोचले. काही कळण्याअगोदर अंगावर रॉकेल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.