Wed, Feb 19, 2020 12:32होमपेज › Vidarbha › नागपूर : लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; बस- कंटेनर अपघातात ६ जण जागीच ठार, १० जखमी

नागपूर : लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; बस- कंटेनर अपघातात ६ जण जागीच ठार, १० जखमी

Last Updated: Feb 16 2020 1:53AM
नागपूर : विशेष प्रतिनिधी 

लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेली बस रस्त्यात उभ्या कंटेनरला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात सहाजण जागीच ठार झाले. तर दहा वर्‍हाडी जखमी आहेत. नागपूर- भंडारा महामार्गावर शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

या घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, ८ ते १० जण जखमी असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस भंडारा जिल्ह्यातून लग्न वऱ्हाड घेऊन नागपूरला परत येत होती. बसमध्ये नागपूर येथील गांधीबागच्या पोलिस कॉलनीमधील परिवार असल्याची माहिती आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी ही बस कंटेनरला धडकली तेव्हा भला मोठा आवाज झाला.

नागपूर भंडारा रोडवर मौदा पोलिस स्टेशन अंतर्गत शिंगोरी गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली. लग्नाचे वऱ्हाड तिरोडावरून नागपूरला परतत होते.