Sat, Jul 04, 2020 14:46होमपेज › Vidarbha › यवतमाळ मध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक, १७ नवे पॉझिटिव्ह रूग्ण

यवतमाळ मध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक, १७ नवे पॉझिटिव्ह रूग्ण

Last Updated: Jun 02 2020 10:14AM
नागपुर: पुढारी वृत्तसेवा

कोरोनामुक्त होत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मंगळवारी सकाळी यवतमाळमध्ये एकाच वेळी १७ संशयीत रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी १३ जण एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता आणखीनच वाढली आहे. 

गेल्या २४ तासात १७ नवे रूग्ण आढळल्याने कोरोना बाधितांची संख्या १४५ वर पोहोचली आहे. त्यापैकी १०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर ३ जण मृत झाले आहेत. सध्या ३६ कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पॉझिटिव्ह आलेले सर्व १७ रूग्ण हे विलगीकरण कक्षातच ठेवण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब नमुने घेण्यात येणार आहेत.