होमपेज › Vidarbha › वाशिम जिल्ह्यात घरीच ईद साजरी

वाशिम जिल्ह्यात घरीच ईद साजरी

Last Updated: May 25 2020 4:44PM

संग्रहित छायाचित्रवाशिम : पुढारी वृत्तसेवा

दरवर्षी उत्साहात व आनंदात सर्वासमवेत साजरी होणारी रमजान ईद यावर्षी घरीच साजरी करण्यात आली. ईदची खरेदी मोठ्या प्रमााणात सुरु असते. गरीब- श्रीमंत असे प्रत्येकजण आपल्या परिवारातील व्यक्तींसाठी आपापल्या परीने वस्तू खरेदी करतात. मशिदीला आकर्षक रोषणाई केली जाते. गरिबांना दान केले जाते.  

मात्र, या वर्षी मुस्लिम बांधवांना लॉकडाऊन व जमावबंदी आदेशामुळे मशिदीमध्ये जाता येत नसल्याने सर्व धार्मिक विधी आपापल्या घरीच करावी लागत आहे. यावर्षी मुस्लिम समाजाने शासनाच्या आदेशाचे पालन करून सामाजिक अंतर ठेवून घरातच हा पवित्र सण उत्साहात साजरा करून स्थानिक प्रशासनाला मदतच केली आहे.