Wed, Sep 23, 2020 01:33होमपेज › Vidarbha › बाळाला जन्म देण्यासाठी तिने केली तब्बल २८ किमी पायपीट! 

बाळाला जन्म देण्यासाठी तिने केली तब्बल २८ किमी पायपीट! 

Last Updated: Jul 08 2020 9:56AM
गडचिरोली : पुढारी ऑनलाईन 

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात एका ९ महिन्याच्या महिलेने प्रसुतीसाठी तब्बल २८ किमीची पायपीट केल्याची घटना घडली आहे. रूग्णालयात जाण्यासाठी एक गर्भवती आदिवासी महिलेने 'आशा' वर्करसोबत पाण्यातून, चिखलातून वाट काढत गावापासून २८ किमीचा प्रवास केला आणि बाळाला जन्म देऊन सुखरूप परतली. ही घटना भामरागढ तालुक्यातील आहे. 

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागढ ग्रामीण भाग असून या गावातील एक महिला रोशनी पोदाडी ९ महिन्याची गर्भवती होती. तिच्या गावापासून प्राथमिक आरोग्य केंद्र लाहिरी येथे आहे, जे २८ किलोमीटर दूर आहे. येथे येण्या-जाण्यासाठी कुठलेही साधन नाही. त्यामुळे रोशनीने पायीच हा रस्ता पार करण्याचा निर्णय घेतला. 

रोशनी आशा वर्करसोबत पावसात नदी पार करत अनेक कठीण परिस्थितींचा सामना करत रूग्णालयात पोहोचली. तपासानंतर तिला हेमलकसा येथील लोक बिरादरी रूग्णालयात पोहोचवलं. रोशनीने एका परीला जन्म दिला. प्रसुतीनंतर ही आदिवासी महिला पुन्हा २८ किलोमीटर जंगल आणि नदी पार करत आपल्या मुलासोबत आपल्या घरी परतली.
 

 "