Thu, Jul 02, 2020 12:22होमपेज › Vidarbha › डॅडी पुन्हा जेलबाहेर येण्याची शक्यता

डॅडी पुन्हा जेलबाहेर येण्याची शक्यता

Published On: Mar 24 2019 1:45AM | Last Updated: Mar 29 2019 1:40AM
नागपूर : प्रतिनिधी

गुन्हेगारी विश्‍वातील कुख्यात गुंड अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी पुन्हा एकदा जेलबाहेर येण्याची शक्यता असून, संचित रजेसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात डॉन अरुण गवळीने याचिका दाखल केली आहे. पुढील सोमवारी म्हणजेच 25 मार्च रोजी या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी होणार आहे. त्यामुळे अरुण गवळीची संचित रजा नागपूर खंडपीठ मंजूर करते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात अरुण गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अरुण गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. अरुण गवळी याआधीही दोन ते तीन वेळा जेलबाहेर आला आहे. मुलाचे लग्न, आजारपण अशी कारणे देत अरुण गवळी जेलबाहेर आला होता. आता पुन्हा नागपूर मध्यवर्ती कारागृह अरुण गवळीला रजा मंजूर करुन बाहेर सोडणार का, हे सोमवारीच स्पष्ट होईल.सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने अरुण गवळीसारख्या गुंडाला रजेनिमित्त जेलबाहेर पाठवणे कितपत योग्य ठरेल, हाही प्रश्‍न या निमित्ताने उभा राहिला आहे.