Sun, Dec 08, 2019 07:44होमपेज › Vidarbha › सहगल यांना विरोध अत्यंत लाजीरवाणी बाब : लक्ष्मीकांत देशमुख

सहगल यांना विरोध अत्यंत लाजीरवाणी बाब : लक्ष्मीकांत देशमुख

Published On: Jan 11 2019 7:25PM | Last Updated: Jan 11 2019 7:56PM
यवतमाळ : पुढारी ऑनलाईन

साहित्य संमेलानाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना निमंत्रण देऊन त्यांना कार्यक्रमास पुन्हा न येण्यास सांगणे ही गोष्ट अत्यंत खेदपूर्ण आहे. ही घटना साहित्य महामंडाळासाठी तसेच साहित्यसंमेलनाच्या परंपरेसाठी ही अत्यंत लाजीरवाणी आहे. अशी टीका साहित्यसंमेलानाचे मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या भाषणात केली. सध्या देशात अभिव्यक्ती स्वांतत्र्याचा प्रश्न गंभीर झाला असून लेखक व कलाकारांचा आवाज दाबण्यात येत असल्याचीही टीका त्यांनी यावेळी केली. 

साहित्यिका नयनतारा सहगल वादाच्या पार्श्वभूमीवर आज यवतमाळ येथे ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास सुरुवात झाली. या घडलेल्या घटनेचा निषेध करत यावर मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी टीकेची झोड उठवली. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर साहित्य क्षेत्रातील अनेक मोठ्या दिग्गजांनी नयनतारा यांचे मुखवटे घालूनच संमेलनस्थळी दाखल होऊन घडलेला प्रकाराचा निषेध नोंदवला. 

लक्ष्मीकांत देशमुख पुढे म्हणाले, नयनतारा सेहगल यांच साहित्यातील योगदान खूप मोठे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यच्या मुद्द्यावर त्या नेहमीच झगडत आल्यात आहेत. नेहमी त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे. या देशात जेव्हा आणीबाणी लादण्यात आली तेव्हा त्यांच्या बहिण असणाऱ्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा त्यांनी कडाडून विरोध केला. जेव्हा इंदिरा गांधीच्या हत्त्येनंतर दिल्ली, हरियाणा आणि पंजाब या ठिकाणी जी शिखांची कत्तल झाली. या नरसंहाराचा ही त्यांनी विरोध केला होता. महाराष्ट्रातील विचारवंतच्या हत्त्येनंतर त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईत ठोस भूमिका घेत आपणास मिळालेला साहित्य अकादमी हा पुरस्कार सरकारला परत केला. या पुरस्कार वापसीमध्ये आघाडीवर रहात त्यांनी अन्याया विरोधात आवाज उठवला आहे. नयनतारा यांच्या या विचारांना मी सलाम करतो असे म्हणून पाहुण्याला बोलवयच आणि नंतर येऊ नका म्हणायच याबाबत मी चिंतीत असल्याचे ते म्हणाले.