Thu, Jan 21, 2021 01:00होमपेज › Vidarbha › बारा दिवसांनंतर नागपुरात कोरोनाचा एक रूग्ण वाढला, एकूण संख्या ५

बारा दिवसांनंतर नागपुरात कोरोनाचा एक रूग्ण वाढला, एकूण संख्या ५

Last Updated: Mar 26 2020 3:49PM
नागपूर : विशेष प्रतिनिधी

तब्बल १२ दिवसांनंतर नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णाच्या संख्येत गुरूवारी एकने वाढ झाली आहे. नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता ५ एवढी झाली आहे, असे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

वाचा : केंद्र सरकारकडून कोरोना लॉकडाऊनवर १ लाख ७० हजार कोटींचा उतारा!

नव्याने वाढ झालेला हा रूग्ण कामानिमित्त दिल्लीला गेला होत. १८ मार्चला हा रूग्ण नागपुरात रेल्वेने परत आला अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, नागपुरातील चार पैकी तीन रूग्णांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. यापैकी पहिल्या रूग्णाच्या तीनही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. मात्र, आरोग्य प्रशासनाने अद्याप त्या रूग्णाला कोरोनामुक्त रूग्ण म्हणून घोषित केलेले नाही. तर यवतमाळमध्येही कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ४ वर स्थिरावली आहे. यवतमाळमधील दोन रूग्णांच्या प्रकृतीत ही सुधारणा होत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितलंय.

वाचा : कोरोना विरुद्ध लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ५० लाखांचे विमाकवच!

नागपुरात आज दिवसभरात ३५ संशयित रूग्ण आढळून आले असून एकूण संशयितांची संख्या ४८६ एवढी झाली आहे. नागपुरातील मेयो रुग्णालयात २ आणि शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात ३ अशा पाच रुग्ण कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यत एकूण भरती केलेल्या व्यक्तीची संख्या २४८ आहे. आज ३४ तपासणी नमुने घेण्यात आले. आतापर्यत एकूण तपासणी केलेले नमुने २७५ असून त्यापैकी ५ नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागील पंधरा दिवसांत ८५५ व्यक्तींना त्यांच्या घरीच विलगीकरण करून देखरेखीखाली ठेवले आहे. तर, १३८ व्यक्ती अद्यापही रूग्णालयाच्या विलगीकरण कक्षात आहे. आज २८ व्यक्तींना विलगीकरण कक्षातून घरी जाण्यासाठी सुटी देण्यात आली. 

वाचा : इस्लामपूर : 'त्या' चौघांच्या संपर्कात आलेल्या पाच जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

१४ दिवस पाठपुरावा केलेल्या व्यक्तींची संख्या ४७ असून विमानतळावर आतापर्यंत ११२३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.