अमरावती : प्रतिनिधी
दिवाळीच्या पहिल्या दिवशी सगळीकडे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अमरावतीमधील बडनेराजवळील मधूबन वृद्धाश्रममध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बडनेराचे आमदार रवी राणा आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश बुब यांच्या दोघांमध्ये राडा झाला. खासदार नवनीत राणा यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्याने हा वाद निर्माण झाला. संतापलेल्या राणा आणि बुब यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कार्यक्रमापूर्वी शाब्दिक वाद झाला.
शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर पुन्हा राणा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.
दरम्यान घडलेल्या या सर्व प्रकारामुळे वृद्धाश्रमासह परिसरातील लोक संतापलेली असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच घडलेल्या या प्रकारामुळे वृद्धांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.
घडलेल्या या प्रकारामुळे प्रकारामुळे वृद्धांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. दिवाळीच्या निमित्ताने मी वृद्धाश्रमात गेलो होतो. मात्र त्यावेळी तिथे आलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या कार्यकर्त्यांनी महिलांविरुद्ध अपशब्द वापरले,” असा आरोप रवी राणा यांनी केला आहे.
दिनेश बुब यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. “मी किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी नवनीत राणा यांच्या विषयी कोणतेही अपशब्द काढलेले नाही,” असेही ते म्हणाले.
दरम्यान घडलेल्या या सर्व प्रकारामुळे वृद्धाश्रमासह परिसरातील लोक संतापलेली असल्याचे पाहायला मिळत आहे. शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर पुन्हा राणा व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश बुब यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.