Thu, Jan 28, 2021 07:11होमपेज › Vidarbha › नंदुरबार : लागोपाठ १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

नंदुरबार : लागोपाठ १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Last Updated: Jul 04 2020 2:39PM
नंदुरबार : पुढारी व्रुत्तसेवा

प्रलंबित असलेले तपासणी अहवाल नंदुरबार जिल्हा रुग्णालयाला रात्री प्राप्त झाले. १२ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर येताच शहादा व नंदुरबार येथील यंत्रणा अलर्ट झाली. मागील ४८ तासांत पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या १७ झाली आहे.

जिल्ह्यातून एकूण २०३२ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सतराशे पन्नास अधिक नमुने निगेटिव्ह आले आहेत. शुक्रवारी रात्री १२ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये नंदुरबार आणि शहादा शहरातील व्यक्तींचा समावेश अधिक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार शहराच्या सरस्वती नगरातील २१ वर्षीय एक पुरुष, १४ वर्षांची मुलगी आणि ४४ वर्षांची महिला यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. शहादा येथे सदाशिव नगरात २० वर्षीय महिला,  कुकडेल मराठा गल्ली २८ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, कल्याण नगर - ३४ वर्षीय पुरुष, साईबाबा नगर-३७ वर्षीय पुरुष, वृंदावन -६२ वर्षीय पुरुष, गांधीनगर कुकडेल - ३५ वर्षीय पुरुष, अंबाजी नगर लोणखेडा - ४३ वर्षीय पुरुष यांचा तर मोलगी (ता. अक्कलकुवा) येथील २३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. 

या सर्व भागात बॅरिकेटिंग करणे, सॅनिटायझिंग करणे आदी उपाय करण्यात आले आहेत. कालचा शुक्रवार रोजी सकाळी शहरासह जिल्ह्यातील ५ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर २४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला होता.  त्या कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील रेल्वे कॉलनी ३६ वर्षीय पुरुष, नंदुरबार, पंचायत समिती - ३२ वर्षीय पुरुष, नवापूर येथील मंगलदास पार्कमधील ६५ महिला, नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागातील ५० वर्षीय महिला, नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी येथील ५० वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.