नागपूर : प्रतिनिधी
शाळा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो चार भिंतींचा वर्ग.. फळा, बाकं. मात्र अमरावतीत एक अशी शाळा भरते तिथे ना बाके आहेत, ना भिंती. ही कहाणी आहे फूटपाथवर भरणार्या शालाबाह्य मुलांच्या एका बिना भिंतीच्या शाळेची.
रुचित त्यागी आणि अलोककुमार या दोघा आयआयटीच्या विद्यार्थी आहेत. त्यांच्या संकल्पनेतून शाळा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांनीही शिक्षणापासुन वंचित असलेल्या मुलांना मोफत शिक्षणाचे धडे देण्यास सुरूवात केलीआहे.
रुचित आणि अलोक दोघे शहरात सकाळी फिरण्यासाठी जात. तेव्हा रस्त्यावर भीक मागणारे मुले त्यांना दिसत. शाळेत न जाणार्या मुलांना तुम्ही शाळेत का जात नाही. असा प्रश्न केला मात्र ते निरुत्तर होते. आम्ही तुम्हाला शिकवल्यास तुम्ही शिकणार का? असे विचारले असता त्यांनी होकार दिला. मात्र ते शिकण्यासाठी कुठे येणार हा प्रश्न होता. यावर तोडगा काढत इर्विन चौकात सकाळी दुकान बंद असताना दुकानांसमोर या मुलांना शिकवण्याचे काम सुरू केले.
दररोज सकाळी साडेसहा ते आठ वाजेपयरत हल्ली ही फुटपाथवरची ’शाळा’ सुरू झाली आहे. दररोज सकाळी फुटपाथवर भरणारी शाळा अमरावतीकरांसाठी आकर्षण ठरत आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून चार मुलांना शिकवत आहोत. त्यांना दहाच दिवसात एबीसीडी आणि उजळणी देखील येत असुन अशा मुलांचीसंख्या वाढाविण्यासाठी आम्ही शाळाबाह्य मुलांचा शोध घेत असल्याचेही अलोककुमार यांने सांगितले.