Fri, Dec 13, 2019 04:58होमपेज › Vidarbha › प्रेयसीकडून प्रियकराचे लैंगिक शोषण; पोलिस बुचकळ्यात!

प्रेयसीकडून प्रियकराचे लैंगिक शोषण; पोलिस बुचकळ्यात!

Published On: Apr 13 2018 1:20AM | Last Updated: Apr 13 2018 1:34AMनागपूर : प्रतिनिधी

प्रेयसीने मला लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करत लैंगिक शोषण केले. त्यामुळे तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एका संत्रस्त प्रियकराने बुधवारी पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली. शशांक डोंगरे असे पीडित प्रियकराचे नाव आहे. युवकाच्या तक्रारीसमोर पोलिस हतबल असून त्याने दिलेल्या तक्रार अर्जावर काय कारवाई करावी, अशा संभ्रमात आहेत.

पीडित शशांक हा अभियंता असून त्याची 2008 साली नातेवाईकाच्या लग्नात आसावरी हिच्याशी ओळख झाली. तिने नातेवाईकांकडून शशांकचा मोबाईल नंबर मिळवला आणि फोनवरून मैत्री केली. एकाच शहरात राहत असल्याने तिने भेटण्याची इच्छा व्यक्त केली. शशांक त्यावेळी नोकरी आणि शिक्षण घेत होता. दोघांची भेट झाल्यानंतर तिने थेट त्याला प्रपोज केले. त्यानेही होकार देत प्रेमाचा स्वीकार केला. आठवड्याभरातच तिने कुटुंबीयांशी भेट घालून प्रियकर असल्याची ओळख करून दिली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना भेटण्याचा तगादा लावला. त्यानेही आपल्या कुटुंबीयांची ओळख करून दिली. दोघांत नऊ वर्षे प्रेमसंबंध होते. यानंतर तिने लग्नाचा तगादा लावला. 

मात्र पूर्ण शिक्षण करताच तिला स्पर्धा परीक्षेचे क्‍लासेस लावून दिले. 2014 मध्ये तिला एका बँकेत नोकरी लागली. दोघांच्याही घरच्यांनी लग्नास होकार दिला. या दरम्यान आसावरीने एक दिवस घरी बोलावून बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप शशांकने केला आहे. त्यानंतर ती वारंवार शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होती. तिच्या दबावाला बळी पडून तब्बल आठ वर्षे लैंगिक शोषण केल्याचा आरोप शशांकने केला आहे. त्यानंतर तिला लग्नाविषयी विचारले असता तिने चक्क नकार दिला. 

Tags : Mumbai, marriage, bait, gril, Sexual abuse,  Mumbai news,