Mon, Jul 06, 2020 16:57होमपेज › Vidarbha › जळगावमध्ये बिबट्याकडून सहावा बळी, वृध्दा ठार

जळगावमध्ये बिबट्याकडून सहावा बळी, वृध्दा ठार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जळगाव : प्रतिनिधी

चाळीसगाव तालुक्यात तब्बल एक नव्हे दोन नव्हे तर पाच जणांचा लागोपाठ बळी घेणार्‍या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश सोमवारी राज्याच्या वनमंत्र्यांनी दिला. हा देऊन काही तासांचा अवधी होत नाही तोच तालुक्यातील वरखेडे खुर्द येथे वृद्धेवर बिबट्याने हल्ला केल्याने वृद्धेचा बळी गेला. बिबट्याच्या हल्ल्यातील मृतांची संख्या आता सहावर पोहचली आहे. यमुनाबाई तिरमली (वय ७०) असे या हल्ल्यात ठार झालेल्या वृद्धेचे नावआहे. मंगळवारी पहाटे ही घटना उघडकीस आली या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली तर वन विभागाला पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

वस्तीत शिरून वृद्धेवर हल्‍ला

आतापर्यंत शेतामधील जनावरे, नागरीकांवर हल्ला चढवणार्‍या नरभक्षक बिबट्याने चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे खुर्द गावातील झोपडीवजा घरात राहणार्‍या यमुनाबाई दलातिरमली या कुटुंबातील तिघामुलांसह झोपल्या असतानाच बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावर तिरमली यांची मान आढळली तर धडाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. तिघा मुलांसह झोपेत असलेल्या यमुनाबाई यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवत त्यांना ओढून जंगलाकडे घेऊन जात असताना कुटुंबाला जगा आली. हल्‍ल्यात ठार झालेल्या यमुनाबाईंचे डोके सापडले असून धडाचा शोध सुरू आहे.

वरखेडे खुर्द गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावरच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी बिबट्याचा शोध घेत असताना ही घटना घडल्यानंतर पहाटे चार वाजता २० कर्मचारी दाखल झाले. 
नरभक्षक बिबट्याच्या उच्छादाने मंगळवारच्या घटनेसह पाच महिन्यात तब्बल सहा जणांचे बळी गेले आहेत. अत्याधूनिक ड्रोनकॅमेरे, ट्रॅन्क्यूलायझर गन व शॉर्प शुटरसह ३५ जणांची टीम बिबट्याला पकडण्यात अपयशी ठरल्याने ग्रामस्थांमध्ये वनविभागाविषयी संताप व्‍यक्‍त होत आहे. ८ जुलैच्या हल्ल्यात राहुल चव्हाण (वय ८), ११ सप्टेंबरच्या हल्ल्यात अलका अहिरे (५०), ११ नोव्हेंबरच्याहल्ल्यात बाळू सोनवणे (२५), १५ नोव्हेंबरच्या हल्ल्यात दीपाली नारायण जगताप (२५, वरखेडे) तर एक दिवसांपूर्वीच २७ नोव्हेंबर रोजी सुसाबाई धना नाईक ( ५५) यांचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला आहे. 

जनतेत रोष

सोमवारी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांनी हातात बंदूक घेत बिबट्याच्या शोध मोहिमेत सहभाग नोंदवला होता. बिबट्याचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत जिल्हा सोडणार नसल्याचे सुतोवाच त्यांनी केले होते तर मंगळवारी पहाटे सहावा बळी गेल्याने ग्रामस्थांमध्ये आणखीन रोष उफाळला आहे. २७ रोजी बळी ठरलेल्या सुसाबाईभील यांचा मृतदेह नातेवाईकांनी चाळीसगाव पोलिस ठाण्याबाहेर आणून बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मागितल्यानंतर आमदार उन्मेश पाटील यांनी राज्याचे प्रधान सचिव विकास खर्गे यांच्याशी संपर्क साधला होता. वन मंत्र्यांनी बिबट्याला ठार मारण्याचे आदेश देऊन काही तास होत नाही तोच वृद्धेचा बळी गेल्याने ग्रामस्थांच्या संयमाचा बांध सुटला आहे. निष्पापाचे नाहक प्राण जात असल्याने किमान आतातरी प्रशासन व वनविभागाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.