Tue, May 26, 2020 15:11होमपेज › Vidarbha › हिंगणघाट जळीतकांड : आरोपी म्‍हणाला...

हिंगणघाट जळीतकांड : आरोपी म्‍हणाला...

Last Updated: Feb 13 2020 12:49PM

आरोपी विकेश नगराळेनागपूर : पुढारी ऑनलाईन 

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेची अखेर मृत्युशी  झुंज अपयशी ठरली. सोमवारी (१० फेब्रवारी) पहाटे तिचा मृत्यू झाला आणि वर्ध्यासह अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. या तरुणीच्या मृत्यूनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या पीडितेला त्वरीत न्याय मिळावा आणि आरोपी विकेश नगराळे याला लवकरात लवकर फासावर लटकवण्यात यावे अशी मागणी या मुलीच्या मृत्यूनंतर होताना दिसत आहे. राज्य सरकारने देखील हा खटला जलद गतीने चालवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.  याप्रकरणामधील आरोपी विकेश नगराळेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

पीडितेचा मृत्यू झाल्याचे आरोपी विक्कीला  माहित नव्हते. मात्र याची माहिती त्‍याला देण्‍यात आल्‍यानंतर त्‍याने यावर प्रतिक्रिया दिली. माझ्यामुळे सर्वांना त्रास होत असल्याने मला गोळ्या झाडून मारुन टाका, अशी मागणी आरोपीने केली आहे. 

पीडितेच्या मृत्यूनंतर राज्यातील जनतेने व्यक्त केलेला संताप आणि लोकभावनेच्या दबावातून आरोपीने अशी मागणी केल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

पीडितेचा मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी आरोपीला देण्यात आली. त्यानंतर तो बराच काळ आरोपी काहीच न बोलता एकाच जागी उभा होता. नंतर तो आपल्या बॅरेकमध्ये बराच वेळ बसून होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणताच भाव दिसून येत नव्हता. दैनंदिन झडतीदरम्यान आरोपीने, माझ्यामुळे सर्वांना त्रास होतोय तर मला गोळी झाडून मारुन टाका, अशी मागणी पोलिस अधिकाऱ्यांकडे केली.