Sun, Jul 05, 2020 15:58होमपेज › Vidarbha › बिचारा नवरदेव बँडबाजासह पोलिस ठाण्यात

बिचारा नवरदेव बँडबाजासह पोलिस ठाण्यात

Published On: Apr 21 2018 7:41AM | Last Updated: Apr 21 2018 9:52AMनागपूर : प्रतिनिधी 

लग्‍न ठरले, पत्रिका छापल्या, नवर्‍याकडील वर्‍हाडी मंगल कार्यालयातही पोहोचले... परंतु, आजूबाजूला ना नवरीकडील वर्‍हाडी ना नवरी मुलगी तसेच मंगल कार्यालयाला कुलूप बघून नवरदेवाच्या पायाखालची जमीनच सरकली. शेवटी कळले की, नवरी मुलीला नवरदेवच पसंत नाही. त्यामुळे बिचार्‍या नवरदेवाला बँडबाजासह पोलिस ठाण्यात पोहोचावे लागले.

नागपूर येथील रहिवाशी अश्‍विन आणि नीता यांचा लग्‍नाचा 19 एप्रिलला मुहूर्त होता. नवरदेव सर्व तयारी करून वर्‍हाडींसह लग्‍नमंडपी पोहोचला. वधूकडील नातेवाईक मंगल कार्यालयात हजर नव्हते. विचारणा केली, फोनही लावले; परंतु काहीही फायदा झाला नाही. शेवटी फसवणूक झाल्याचे समजताच नवरदेवाने वाडी पोलिस ठाणे गाठले.

Tags : Marriage, wedding, engagement