Wed, Dec 02, 2020 09:05होमपेज › Vidarbha › गडचिरोलीत एसआरपीएफच्या २९ जवानांना कोरोना

गडचिरोलीत एसआरपीएफच्या २९ जवानांना कोरोना

Last Updated: Jul 14 2020 7:46PM
नागपूर : पुढारी ऑनलाईन 

गडचिरोली जिल्ह्यात राज्य राखीव पोलिस दलाच्या २९ जवानांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. आज (दि. १४) सकाळी कृषी महाविद्यालय येथील सीआरपीएफ बटालियनमधील ११ जवानांचे अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले होते. त्यामुळे दिवसभरात ४९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. 

गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या व धुळे येथून आलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील १५० जवानांपैकी २९ जणांचे कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आले. ही दीडशे जवानांची तुकडी गेल्याच आठवड्यात धुळे येथून गडचिरोलीला दाखल झाली होती. 

आत्तापर्यंत जिल्ह्यात केंद्रीय राखीव दलाचे ७२, राज्य राखीव दलाचे २९, सीमा सुरक्षा दलाचे २ असे मिळून १०३ जवान कोरोना बाधित आढळून आले आहेत.

दरम्यान, गडचिरोलीच्या विलगीकरणात असलेला आरोग्य कर्मचारी कोरोना बाधित आढळून आला. हा आरोग्य कर्मचारी कुरखेडा येथील कडोली प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. काही कामानिमित्त गेल्या आठवड्याभरापूर्वी जिल्ह्याच्या बाहेर प्रवास करून आले आहे. त्यांना गडचिरोली येथील विलगीकरण ठेवण्यात आले होते.

काल रात्री आलेल्या अहवालात धानोरा येथील २, मूलचेरा-२, गडचिरोली- २, एटापल्ली व अहेरी येथील एकेकाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह मिळाले.