Fri, May 29, 2020 16:19होमपेज › Vidarbha › आता राष्ट्रवादीकडून नागपुरातून भाजपला 'दे धक्का': माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश 

आता राष्ट्रवादीकडून नागपुरातून भाजपला 'दे धक्का': माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश 

Published On: Sep 14 2019 2:30PM | Last Updated: Sep 14 2019 2:30PM

माजी आमदार विजय घोडमारेंचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेशनागपूर : पुढारी ऑनलाईन 

गेल्या काही दिवसांपासून महागळतीमध्ये अडकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला थोडा का असेना दिलासा देणारी घटना आज (ता.१४) घडली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघाचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी प्रवेश केला. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घड्याळ हाती घेऊन प्रवेश केला.

सेना आणि भाजपने एका बाजून काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यप्रणाली यथेच्छ टीका करत दुसऱ्या त्यांच्याच नेत्यांची पळवापळवी करत सुटले आहेत. त्यामुळे मुळ कार्यकर्ते बाजूला पडून आयारामांचीच चलती दोन्हीही पक्षामध्ये झाली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसची गळती रोखण्यासाठी स्वतः शरद पवार येत्या मंगळवारपासून राज्याचा दौरा करणार आहेत. हिंगणा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला होता. मात्र भाजपनेही त्या ठिकाणी पाय रोवण्यास प्रारंभ केला आहे.  विजय घोडमारे २००९ मध्ये नागपुरातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, २०१४ मध्ये त्यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराज होते.