Thu, Jan 21, 2021 00:46होमपेज › Vidarbha › नागपुरातील पेट्रोल पंप दरोडा हत्येप्रकरणी पाच जण अटकेत

नागपुरातील पेट्रोल पंप दरोडा हत्येप्रकरणी पाच जण अटकेत

Last Updated: May 23 2020 11:19AM

संग्रहित छायाचित्रनागपूर : पुढारी वृत्तसेवा

नागपुरातील हिंगणा एमआयडीसी परिसरातील पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्याची हत्या करून एक लाखाची रोकड लुटणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. घटनेच्या अवघ्या २४ तासातच हे पाच आरोपी पोलिसांनी अटक केले आहेत. अटक करण्यात आलेल्या पाच पैकी तीन आरोपी सज्ञान असून दोन जण हे अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. 

वाचा : वर्धा: जिल्ह्याबाहेरच्या ९ जणांना कोरोनाची लागण

या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सागरसिंग उर्फ पाजी उर्फ बाला कपूरसिंग बावरी (२०,रा. सूरजनगर, हिंगणा) हा सराईत गुन्हेगार आहे, सध्या फरार आहे. या आरोपीला पकडण्याकरीता पोलिसांनी तीन पथके तयार करून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. तर दरोडा आणि हत्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेले अक्षय शालिक जाधव (१९, रा. बनवाडी, हिंगणा), अनिल रामसिंग पाल (२४, रा. एमआयडीसी) आणि राहुल सुरेश राऊत (१८, रा. एमआयडीसी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याखेरीज या प्रकरणातील अन्य दोन आरोपी अल्पवयीन असून त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

ही घटना गुरुवारी सकाळी वानाडोंगरीजवळील हिंगणा-अमरावती बायपास येथे घडली. पंढरी श्रीराम भांडारकर (वय ६१, रा. वैभवनगर) असे मृताचे तर लीलाधर मारोतराव गोहते (वय ५३, रा. पूजा लेआउट, जयताळा) असे जखमीचे नाव आहे. हिंगणा-अमरावती बायपास येथे संजय मधुकर उगले (वय ४७, रा. दीनदयालनगर) यांच्या मालकीचा विद्या सर्वो नावाचा पेट्रोलपंप आहे. तेथे ही घटना घडली होती. यातील आरोपीने दोन्ही कर्मचार्‍यांना मारहाण करून एक लाख रूपये लुटून नेले होते. या घटनेत एका कर्मचार्‍याचा मृत्यू झाला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक रमेश हत्तीगोटे, उपनिरीक्षक नितीन मदनकर, देवानंद बगमारे, विकास जाधव, अरविंद मोहोड, विजय नेमाडे, दत्तराम काळे, योगेश बहादुरे आणि आशिष दुबे यांनी रात्रभर तपास केला. पोलिसांनी १५ संशयितांची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी त्यातील काही जणांनी गुन्ह्याची कबूली दिली.

वाचा :यवतमाळ : आणखी २ पॉझिटिव्ह; रूग्‍ण संख्या १६ वर