Fri, Jul 10, 2020 01:18होमपेज › Vidarbha › ज्ञानसाधू वासुदेवराव चोरघडे यांचे निधन

ज्ञानसाधू वासुदेवराव चोरघडे यांचे निधन

Published On: Nov 05 2018 1:28AM | Last Updated: Nov 05 2018 12:45AMनागपूर : प्रतिनिधी

भारतीय दर्शनाचे गाढे अभ्यासक, ख्यातकीर्त प्रवचनकार ज्ञानसाधू वासुदेवराव चोरघडे यांचे रविवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. अभ्यंकरनगर येथील शिवकृपाफ या निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघून अंबाझरी घाटावर नेण्यात आली. तेथे शोकाकुल चाहत्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आला.  
वासुदेवराव चोरघडे यांनी वेदशास्त्र संपन्‍न अंबादासशास्त्री पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैदिक व संस्कृत साहित्य आणि दर्शन शाखांचा अभ्यास केला. वेद व उपनिषदातील तत्वविचार, दर्शनशास्त्रातील मीमांसक तर्कसंगत भाष्य व संस्कृत साहित्यातील रसाळ समीक्षा याचा गाढा व्यासंग असल्यामुळे त्यांचे लेखन-वक्‍तृत्व भावसंपन्‍न होते. आचार्य परंपरेतील पांडित्याचे लेणे सांभाळून संत वाययातील भाव संपदा त्यांनी संपादन केली होती. आचरणशील असूनही ते कर्मकांडाच्या आहारी गेले नाहीत किंवा पक्षपाती समर्थक झाले नाहीत. 

खणखणीत वाणी व सफाईदार लेखन यांच्या बळावर प्रारंभी त्यांनी आकाशवाणीसाठी लेखन केले. नियतकालिकांना सरस मजकूर दिला. त्यातून विदर्भ साहित्य संघ, विनोबा विचार केंद्र, भागवत सेवा समिती व भारतीय विद्याप्रसारक संस्था यातून त्यांचा प्रभावी वावर राहिला. दत्त संप्रदाय व यतीश्रेष्ठ दत्तावतार वासुदेवानंद सरस्वती यांचे वाङ्मय आणि विभूतिमत्व यांच्याशी साधना मार्गाने संबद्ध होणारा त्यांचा प्रयत्न दत्त संप्रदायामुळे कर्म, भक्‍ती व ज्ञान यांचा वस्तुपाठ सादर करणारा ठरला. 

वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबेस्वामी यांना दत्त संप्रदायात दत्तावतार मानतात. त्यांची संस्कृत व मराठीत विपुल ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या ङ्गकृष्णालहरीफ काव्याचा इंग्रजी अनुवाद व ङ्गनर्मदा लहरीफ काव्याचा हिंदी अनुवाद चोरघडे यांनी केला. दत्त संप्रदायाचा आचार धर्म आणि स्तोत्र वाययाचा मागोवा घेत तीर्थक्षेत्रे व धर्मस्थळे यांचे त्यांनी उलगडून दाखविले महात्म्य आजही वाचकप्रिय आहे.