Tue, Jun 15, 2021 12:26होमपेज › Vidarbha › मुलीच्या लग्नाची चिंता; शेतकर्‍याची आत्महत्या

मुलीच्या लग्नाची चिंता; शेतकर्‍याची आत्महत्या

Published On: Dec 14 2017 2:24AM | Last Updated: Dec 14 2017 2:24AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

भंडारा जिल्ह्यातील पांजरा गावातील शेतकरी मोतीलाल गजभिये यांनी आपल्याच शेतातील झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. यावर्षी मोतीलाल यांनी आपल्या तीन एकर शेतीमध्ये धान पिकाची लागवड केली. मात्र, अल्प प्रमाणात पाऊस आल्याने त्यांच्या शेतात धान्यच पिकले नाही. मुलीचे लग्न कसे करावे, या विवंचनेत तसेच गावातील लोकांकडून शेती लागवड करण्याकरिता काही लोकांकडून उधारीने पैसे घेतले होते, ते कसे फेडावे. या चिंतेत मोतीलाल गजभिये यांनी आपल्याच शेतात गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविली. मात्र, एकीकडे सरकार कर्जमाफी केली असल्याचा दावा करत असून ऑनलाईनच्या कचाट्यात शेतकरी सापडला आहे.