Fri, Dec 04, 2020 04:55होमपेज › Vidarbha › अमरावतीत आठवडाभरात तब्बल पावणेदोनशे रुग्ण

अमरावतीत आठवडाभरात तब्बल पावणेदोनशे रुग्ण

Last Updated: Jul 04 2020 8:42AM

file photoनागपूर : पुढारी वृत्तसेवा 

विदर्भातील नागपूर, अकोला नंतर आता अमरावतीत कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. मागील एका आठवड्यात तब्बल पावणेदोनशेहून अधिक नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. सात दिवसांत कोरोनाचे १८० नवीन रूग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. 

वाचा : मित्रपक्षांनाही विचारात घ्या

अनलॉक १ आणि अनलॉक २ मध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक वेगाने होत आहे. अमरावती महानगरपालिकेतही दोन कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यातील एक कर्मचारी हा महापौर कार्यालयातील असल्याने अमरावतीचे महापौर चेतन गावंडे यांच्यासह त्यांचे सात सहकारी क्वारंटाईन झाले आहेत. या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

मागील २४ तासांत अमरावतीत कोरोनाचे तब्बल ४४ नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अमरावतीत कोरोनाग्रस्तांची संख्या ६५० एवढी झाली आहे. आली. ग्रामीण भागात कोरोनाची वाढ सुरूच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६५० कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली असून प्रत्यक्षात १९६ ॲक्टिव्ह रुग्ण आहे. त्यापैकी १२ रुग्णांना नागपुरात हलविण्यात आले आहे. आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत ४२९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

वाचा : एसटी कर्मचार्‍यांना जूनचा अर्धाच पगार मिळणार?

जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या चक्रधरनगर येथील ४० वर्षीय पुरूष, चवरे नगर येथील ५१ वर्षीय पुरूष, दरोगा प्लॉट येथील ६० वर्षीय पुरूष, कंवर नगर येथील १९ वर्षीय युवक, सिंधू नगर येथील ५२ वर्षीय पुरूष, अंबिका नगर येथील ४२ वर्षीय पुरूष, नवीवस्ती बडनेरा येथील २६ वर्षीय महिला, दरोगा प्लॉट येथील २२ वर्षीय युवक, पीडीएमसी वसतीगृहातील २७ वर्षीय युवती, पन्नालाल नगर येथील २४ वर्षीय युवती, सहकार नगर येथील ३२ वर्षीय महिला आणि सरस्वती नगर येथील १७ वर्षीय मुलगी, नवाथे नगर येथील ४३ वर्षीय महिला, आदर्श नेहरू नगर येथील ४९ वर्षीय पुरूष, अशोक नगर येथील ४० व ३७ वर्षीय महिला, २९ व २५ वर्षीय युवक,४५ वर्षीय पुरूष, बडनेरा माळीपुरा येथील ६० वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरूष, दस्तूर नगर मधूबन ले आऊट येथील 58 व 38 वर्षीय महिला, 34 वर्षीय पुरूष, चांदणी चौक येथील 50 वर्षीय महिला, धारणी येथील 30 वर्षीय पुरूष, अमरावती महाजनपुरा येथील 40 वर्षीय महिला, जेल रोड क्वारंटाईन सेंटर येथील 55 वर्षीय महिला, आशियाड कॉलनी येथील 57 वर्षीय पुरूष, भीम नगर येथील 55 वर्षीय पुरूष, नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रूग्णालयातील 42 वर्षीय महिला, गजानन नगर येथील 54 वर्षीय महिला, माळीपूरा बडनेरा येथील २ वर्षीय बालिका, अशोकनगर येथील ७२ वर्षीय पुरुष, आदर्श नेहरू नगर येथील १७ वर्षीय पुरुष, अमरावती, गुलजार पुरा अंजनगाव सुर्जी येथील ३१ वर्षीय महिला, अंजनगाव सुर्जी, अशोकनगर येथील ३० वर्षीय, २१ वर्षीय दोन पुरूष, प्रिया टाऊन शिप शेगाव नाका येथील २५ वर्षीय महिला आणि २० वर्षीय पुरूष, योगीराजनगर, तपोवन येथील १९ वर्षीय पुरुष, हबीबनगर येथील ५३ वर्षीय आणि ३४ वर्षीय दोन पुरूष यांचा समावेश आहे.

वाचा : मुंबईत कोरोनामुळे पोलीस अधिकार्‍याचा मृत्यू