Sun, Sep 27, 2020 03:25होमपेज › Vidarbha › 'व्हॅलेंटाईन डे'ला विद्यार्थिनींनी घेतली प्रेमविवाह न करण्‍याची शपथ

'व्हॅलेंटाईन डे'ला विद्यार्थिनींनी घेतली प्रेमविवाह न करण्‍याची शपथ

Last Updated: Feb 16 2020 1:53AM

अमरावतीमध्ये व्हॅलेंटाईन डेला विद्यार्थिनींनी घेतली प्रेमविवाह न करण्‍याची शपथ   अमरावती : विशेष प्रतिनिधी

आज १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनडे हा प्रेमाचा दिवस साजरा होत असतानाच अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील एका महाविद्यालयात मुलींनी प्रेमविवाह न करण्याची शपथ घेतली आहे. महिला महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या या मुलींच्या प्रतिज्ञेमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. 

►सिंचन घोटाळा : अन्य तपास यंत्रणांना प्रतिवादी करण्यास न्यायालयाचा नकार

दिवसेंदिवस प्रेमप्रकरणात वाढ होत आहे, तर हुंडा घेण्याची पद्धत सुद्धा वाढली आहे. यात मुलीचे नुकसान होते आणि काही प्रसंगी संपूर्ण आयुष्याचे नुकसान होते. नेमका हाच दृष्टीकोन डोळ्यापुढे ठेवून अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील महिला व कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिंनींनी (मुलींनी) चक्क व्हॅलेंटाईनडेच्या प्रसंगी प्रेमविवाह न करण्याची आणि हुंडा देऊन लग्न न करण्याची शपथ घेतली. मुलींनी हात समोर ठेवत महाविद्यालयीन तरुणीनी प्रेमविवाह न करण्याची आणि हुंडा घेणाऱ्या तरुणाशी लग्न न करण्याची शपथ घेतली. 

►भागवत कथा सांगायला येऊन विवाहितेला पळवून नेलेल्या महाराजाचा खुलासा

व्हॅलेंटाईन डेच्या प्रसंगीच विद्यार्थ्यीनींनी चक्क प्रेमात न पडण्याची शपथ 

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारे महिला व कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना प्रेमविवाह न करण्याची शपथ दिली आहे. सध्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या शपथेची जोरदार चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रात घडत असलेल्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर ही शपथ घेतली, असा अंदाज लावला जात आहे. या संदर्भात बोलताना महाविद्यालयाचे प्रा. प्रदीप दंदे यांनी सांगितले की, समाजात दरदिवशी प्रेमप्रकरणातून मुलींवर होणार्‍या अत्याचारांच्या घटना वाढत आहे. या घटनांना कुठेतरी पायबंद बसावा याकरीता सुरूवात करण्यासाठी हा उपक्रम घेतला असल्याचे प्रा. दंदे यांनी सांगितले. 

►नागपूर : आता महिला डॉक्टरवर केलेल्या ॲसिड हल्ल्यात तिघी जखमी

शपथेतील मजकूर पुढीलप्रमाणे

मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई-वडिलांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे सभोवताली घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेमविवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पीढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सुनेकडून हुंडा घेणार नाही. तसंच मुलीसाठी हुंडा देणार नाही. समर्थ भारतासाठी, स्वस्थ समाजासाठी एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते.

 "