Wed, Jul 08, 2020 00:31होमपेज › Vidarbha › 'राज्याचा कारभार देवेंद्रच्या नव्हे, तर देवाच्या भरवशावर'

'राज्याचा कारभार देवेंद्रच्या नव्हे, तर देवाच्या भरवशावर'

Published On: Jan 18 2018 9:44AM | Last Updated: Jan 18 2018 9:44AM

बुकमार्क करा
नागपूर : पुढारी ऑनलाईन 

भाजप आमदार आशिष देशमुख यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतले आहे. राज्याचा कारभार देवेंद्रच्या नव्हे, तर देवाच्या भरवशावर सुरु असल्याचा टोला लगावत त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. विदर्भ आत्मबळ यात्रेच्या निमित्ताने आमदार देशमुख अकोल्यात आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

विदर्भ राज्याबद्दल जनजागृती करण्यासाठी तसेच विदर्भाबद्दल जनतेची मते जाणून घेण्यासाठी आमदार देशमुख विदर्भातील 62 मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात 11 जिल्ह्यांच्या दौर्‍यावर असून विदर्भाबद्दल जनमत अजमावत आहेत. 

शेतकर्‍यांना आत्मबळ देण्यासाठी, शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी तसेच बेरोजगार युवकांचे स्थलांतरण थांबविण्यासाठी 7 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान विदर्भ आत्मबळ यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले.