Fri, Dec 13, 2019 05:26होमपेज › Vidarbha › आमदार आशिष देशमुख यांचा  मुख्यमंत्र्यांवर लेटरबॉम्ब 

आमदार आशिष देशमुख यांचा  मुख्यमंत्र्यांवर लेटरबॉम्ब 

Published On: Dec 11 2017 1:35AM | Last Updated: Dec 11 2017 10:37AM

बुकमार्क करा

नागपूर : वृत्तसंस्था

खासदार नाना पटोले यांच्यानंतर आता नागपूरमधील काटोल मतदार संघातील भाजप आमदार आशिष देशमुखही बंडाच्या पवित्र्यात आहेत. सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्‍त करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सात पानांचे पत्र लिहिले असून स्वतंत्र विदर्भाची मागणी रास्त असल्याचे म्हटले आहे.

फडणवीस सरकारने गेली तीन वर्षे प्रयत्न करूनही राज्यातील लोकजीवनात काही परिणामकारक बदल झालेला नाही. शेतकरी सुखी नाही, युवकांना रोजगार नाही, पिकांना भाव नाही, कायदा - सुव्यवस्था अधिक बिघडली आहे, नागपूर क्राईम कॅपिटल बनले आहे, असे आशिष देशमुख यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

नागपूर मेट्रो, स्मार्ट सिटी, समृद्धी महामार्ग यासारख्या प्रकल्पांमुळे जनतेचा फायदाच होणार आहे. या प्रकल्पांवर हजारो कोटी खर्च होत आहेत. मात्र, या कामासाठी लागणारा पैसा लहान उद्योगांना सबसिडी म्हणून दिला असता, तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असती, असे मतही आशिष देशमुख यांनी व्यक्‍त केले आहे.