Tue, Jan 19, 2021 16:17होमपेज › Vidarbha › ऑरेंज फेस्टिवलमधून बाजारपेठ मिळेल : मुख्यमंत्री

ऑरेंज फेस्टिवलमधून बाजारपेठ मिळेल : मुख्यमंत्री

Published On: Dec 16 2017 6:56PM | Last Updated: Dec 16 2017 6:57PM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

संत्रा उत्पादकांच्या हाती जादा पैसा येण्यासाठी त्यांना शाश्वत बाजारपेठेची गरज आहे. वर्ल्ड ऑरेंज फेस्टीवलचे तो उद्देश साध्य होईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. नागपुरात आज वर्ल्ड ऑरेंज फेस्टीवलचे उद् घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, राज्यातील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जयकुमार रावल आणि युपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय श्रॉफ या वेळी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, 'वर्ल्ड ऑरेंज फेस्टीवलसारखे आयोजन हा अतिशय चांगला उपक्रम आहे. यामुळे नागपूरच्या संत्र्याला जागतिक ओळख मिळेल. आज प्रक्रिया उद्योग ही काळाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल. महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या माध्यमातून शीतगृह, लॉजिस्टीक आणि उत्तम दळणवळणाच्या सुविधा निर्माण करून दिल्या जाणार आहेत. मिहानमधील प्रक्रिया उद्योग, नोगा ब्रॅन्डचे पुनरूज्जीवन असे अनेक उपक्रम येणाऱ्या काळात हाती घेतले जाणार आहेत. हा महोत्सव दर वर्षी होईल आणि सरकार त्याला संपूर्ण सहकार्य करेल.' संत्रा संशोधनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला दोन कोटी रुपये देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली.