Fri, Sep 25, 2020 12:26होमपेज › Vidarbha › कामगारांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे

कामगारांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे

Published On: Dec 17 2017 2:59AM | Last Updated: Dec 17 2017 2:59AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

कामगारांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. उच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील हजारो खाण कामगारांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान 58 व्या वर्षी निवृत्त झालेल्या कामगारांना अतिरिक्त दोन वर्षांचे सर्व लाभ द्यावे, असेही उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.  

राज्य सरकारने जारी केलेल्या एका शासन निर्णयानुसार कर्मचार्‍यांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे निश्चित केले आहे. त्यानुसार खाण कामगारांचेही सेवानिवृत्ती वय 58 करण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयाला महाराष्ट्र राज्य खाण कामगार संघटनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. कामगारांना कुठल्याही प्रकारचे सेवानिवृत्ती वेतन मिळत नाही. यामुळे त्यांना सेवाकाळात मिळणारे लाभ 60व्या वर्षापर्यंत मिळायला हवेत. यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही असा दावा संघटनेने केला होता.  उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत राज्य सरकारचा शासन निर्णय रद्द केला. तसेच कामगारांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 करण्याचा आदेश दिला. संघटनेतर्फे अ‍ॅड. विक्रम मारपकवार यांनी बाजू मांडली.