Wed, Jul 08, 2020 03:16होमपेज › Vidarbha › पोहनपार येथे वाघाच्या हल्यात महिला ठार

पोहनपार येथे वाघाच्या हल्यात महिला ठार

Published On: Nov 18 2018 3:43PM | Last Updated: Nov 18 2018 3:43PMचंद्रपूर : प्रतिनिधी

ब्रह्मपुरी तालुक्यातील दक्षिण  परिसरात येणाऱ्या  पोवनपार(वांद्रा)  येथे  आज पहाटेच्या सुमारास शेण टाकण्याकरिता गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. शालू मोरेश्वर डोंगरवार ( वय३५) असे मृत महिलेचे नाव आहे. 

रविवारी पहाटे ६ वाजता शालू  शेण टाकण्याकरिता गावालगत असलेल्या जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेच्या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या खताच्या ढिगारावर गेली होती. दरम्यान शाळेच्या मागे पुलाखाली दडून बसलेल्या वाघाने हल्ला करून तिला ठार केले.

शालूच्या मागे दोन  मुले पती  असा परिवार आहे.शालुच्या जाण्याने पती व लहान मुलांवर मोठे संकट ओढवले आहे.वाघाचे हल्ले दिवसागणिक वाढत चालल्याने मानव वाघ संघर्ष सुरू आहे. संभाव्य धोके लक्षात घेता त्वरित संबंधित विभागाने  तात्काळ बंदोबस्त करावा ,अशी मागणी करण्यात आली असून  आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.