Mon, Dec 09, 2019 05:36होमपेज › Vidarbha › मी लाभार्थी: सरकारला विखेंचे प्रमाणपत्र

मी लाभार्थी: सरकारला विखेंचे प्रमाणपत्र

Published On: Dec 23 2017 11:13AM | Last Updated: Dec 23 2017 11:13AM

बुकमार्क करा

नागपूर : प्रतिनिधी

विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारला मी लाभार्थी प्रमाणपत्र देऊन अनोख्या पद्धतीने निषेध केला. हे सरकार लोकविरोधी असल्याची टीकाही त्यांनी केली.

विखे- पाटील म्हणाले, सरकारचा तीन वर्षांचा कारभार घोषणा आणि भूलथापांचा राहिला. शेतकरी आत्महत्या, कर्जाफी, उद्योग, रोजगार, आरोग्य सेवा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध सरकारने गंभीर पावले उचलली नाहीत. गेल्या सात अधिवेशनांपासून हे सरकार दिशाभूल करीत आहे. याही अधिवेशनात अनेक मुद्द्यांना बगल देत ते स्वतः स्वतःचे कौतुक करून घेत आहे. म्हणून आम्ही या सरकारला महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने सन्मानित केले.