Wed, Sep 23, 2020 21:31होमपेज › Vidarbha › भागवत कथा सांगायला येऊन विवाहितेला पळवून नेलेल्या महाराजाचा खुलासा

भागवत कथा सांगायला येऊन विवाहितेला पळवून नेलेल्या महाराजाचा खुलासा

Last Updated: Feb 16 2020 1:53AM
भंडारा : पुढारी ऑनलाईन

भंडारा जिल्ह्यात भागवत किर्तनाला गावात आलेल्या महाराजाने विवाहितेला जाळ्यात अडकवून पळवून नेल्याचे वृत्त पसरले होते. या घटनेने सोशल मीडियात खळबळ उडाली. मात्र, सदर महाराजांनी हे वृत्त बदनामीकारक असल्याचे म्हटले आहे. मी माझ्या घरी माझ्या पत्नी आणि मुलांसोबतच आहे. मी वारकरी संप्रदायातील व्यक्ती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

अधिक वाचा : पक्ष्यांमध्येही होतो प्रेमाचा केमिकल लोचा!

भंडाऱ्या जवळच्या मोहदूरा येथे भागवत कथा सांगण्यासाठी गावात आलेल्या महाराजाने विवाहितेला जाळ्यात अडकवून पळवून नेल्याची माहिती समोर आली होती. विवाहितेला पळवून नेल्याचा संशय नातेवाईकांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला होता. मात्र, संबंधित महाराजांने हे वृत्त फेटाळले आहे.

अधिक वाचा : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण; नवलखा, तेलतुंबडेंना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच

सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी विनाकारण बदनामी करण्यात आली आहे. माझे कार्य पाहवत नसल्यानेच माझ्या निंदकांकडून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या स्त्रीसोबत माझे संबंध जोडण्यात आले, त्यांचा कसलाही दोष नाही व माझाही कुठला दोष नाही. त्या त्यांच्या घरी सुखरूप आहेत आणि मी माझ्या घरी सुखरूप आहे. 

अधिक वाचा : व्हॅलेंटाईन डे विशेष; नाशिकमध्ये अवतरली ५० लाख रंगीबेरंगी फुलांची मनमोहक दुनिया 

भागवत सप्ताह सुरु असतानाच या महाराजाने विवाहितेला आपल्या जाळ्यात ओढल्‍याची माहिती समोर आली होती. विवाहिता महाराजासोबत गायब झाल्याचे समजल्यानंतर पोलिसानी दोघांचा शोध सुरु केला होता. भंडाऱ्याजवळच्या मोहदूरामध्ये भागवत सप्ताह कथेचे आयोजन २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले. कथावाचन करणाऱ्या दिनेश मोहतुरे महाराजांना आमंत्रित करण्यात आले. कथा सप्ताहात महाराजांनी आपल्या रसाळ वाणीने गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले. अशातच त्यांची नजर भागवतातील एका विवाहितेवर गेली. त्यानंतर त्यांनी तिच्या कुटुंबियांशी जवळीक साधत घरी येणे-जाणे सुरू केले. महाराज घरी येत असल्याने कुणाला संशयही आला नाही. यानंतर महाराजांनी विवाहितेला जाळ्यात ओढले. तीन फेब्रुवारीला भागवत सप्ताहाचा समारोप झाला. मात्र बुधवारी सायंकाळी महाराज सदर विवाहितेला घेऊन गावातून निघून गेल्‍याची तक्रार पोलिस स्‍टेशनमध्ये करण्यात आली होती. 

 "