Tue, Aug 04, 2020 23:18होमपेज › Vidarbha › वाशीम : रागाच्या भरात सीआयएसएफ जवानाचा कॅम्पमध्येच गोळीबार; दोन जवानांचा मृत्यू

वाशीम : रागाच्या भरात सीआयएसएफ जवानाचा कॅम्पमध्येच गोळीबार; दोन जवानांचा मृत्यू

Last Updated: Jan 17 2020 1:15AM
वाशिम : प्रतिनिधी 

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) जम्मू-काश्मीर येथील उधमपूर जिल्ह्यातील सुई या गावामध्ये युनिट क्रमांक २५१ या युनिटमध्ये कर्तव्यात होते. दरम्यान सहकारी कर्मचाऱ्याने तीन जवानांवर गोळ्या झाडून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कारंजा येथील रहिवासी कॉन्स्टेबल तस्लिम सलीम मुन्नीवाले तसेच सहकारी कॉन्स्टेबल बी.एन.मूर्ती तसेच एक अन्य जवानाचा मृत्‍यू झाल्याची घटना काल (ता.१४) जानेवारी रोजी दुपारी घडली आहे.

वाचा : सिंचन घोटाळ्यात मला आरोपी ठरवता येणार नाही : अजित पवार

मिळालेल्‍या अधिक माहितीनुसार, मृत जवानांचे नाव तस्लिम सलीम मुन्नीवाले (वय ३४,रा.गवळीपुरा कारंजा (लाड) जि. वाशिम) असे आहे. हा जवान मुबंई तारापूर सीआयएसएफ मुख्यालयात कार्यरत होता. मात्र, तात्पुरत्‍या स्वरूपात बंदोबस्तासाठी जम्मू-काश्मीर येथे त्यांच्या युनिटला पाठविण्यात आले. तेव्हा ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार त्‍यांचा सहकारी आरोपी संजय ठाकरे यांनी तिन्ही जवानांवर गोळी झाडून त्यांची हत्या केली. 

वाचा : नागपूर : किरकोळ वादात अंगावर फेकले अमोनिया

संजय ठाकरे यांनी तिघा जवानांवर गोळ्या झाडल्‍यानंतर स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तो स्वतः गंभीर असून, तो काही दिवसांपासून मानसिक अस्वस्थ असल्याची माहिती सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिली. तस्लिम हा कारंजा येथील किसनलाल नथमल गोयनका महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. तो सन-२००८ मध्ये नोकरीमध्ये सामील झाला. तो शांत स्वभावाचं होता व त्याच्या मागे आई- वडील, पत्नी दोन मुलं, दोन भाऊ एक बहीण असा आप्त परिवार आहे. तो घरातील सर्वात मोठा मुलगा असल्यामुळे त्यांच्यावर घराची जबाबदारी होती. सध्या त्याचे आई-वडील तसेच पत्नी व मुले मुंबई मध्ये वास्तव्यास आहेत, तर भाऊ कारंजा येथे आहे.