Fri, Jul 10, 2020 02:24होमपेज › Vidarbha › दंड दोन हजाराचा, पावती दोनशेची : वाहतूक पोलिस निलंबित 

दंड दोन हजाराचा, पावती दोनशेची : वाहतूक पोलिस निलंबित 

Published On: Aug 27 2018 8:18PM | Last Updated: Aug 27 2018 7:49PMबुलढाणा : प्रतिनिधी

दुचाकीवरून तीघे जण चाललेल्या चालकाकडून वाहतूक पोलिसाने दोन हजार रूपयाचा दंड वसूल केला. मात्र, चालकास पोलिसाने प्रत्यक्षात फक्‍त दोनशे रूपयांची पावती दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिस अधिक्षकांनी दोन वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबणाची कारवाई केली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश धोटे (रा.आंबेटाकळी, ता.खामगांव) हा दुचाकीवरून आपल्या दोन मित्रांसह खामगांव शहरातून जात होता. नगर परिषद मैदानाजवळ वाहतूक पोलिस मार्गारेट हंस व गणेश जाधव यांनी दुचाकी अडवून दमदाटी करीत मोठ्या रकमेची मागणी केली.

आकाशकडे पैसे नसल्याने पोलिसांनी त्‍यांची दुचाकी पोलिस स्टेशनच्या आवारात आणून लावली. यानंतर आकाशने दंडाची रक्कम म्हणून दोन हजार रुपये वाहतूक पोलिसांना दिले. मात्र, यावेळी वाहतूक पोलिसांकडून दोनशे रुपयांचीच पावती देण्यात आली. मोबाईल कैमेऱ्यात चित्रित झालेल्या ह्या सर्व प्रकाराच्या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर व्हायरल होवून सर्वत्र चर्चेत आला.

या व्हिडिओची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ-पाटील यांनी मार्गारेट हंस व गणे जाधव या दोन्ही वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले.