होमपेज › Vidarbha › धक्कादायक; सहा महिन्यांत 3 हजार अल्पवयीन मुली बेपत्ता

धक्कादायक; सहा महिन्यांत 3 हजार अल्पवयीन मुली बेपत्ता

Published On: Dec 20 2017 2:07AM | Last Updated: Dec 20 2017 2:07AM

बुकमार्क करा

नागपूर : विशेष प्रतिनिधी

राज्यात या वर्षी सहा महिन्यांच्या कालावधीत 2 हजार  965 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या असल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्तिथ केलेल्या तारांकित प्रश्‍नाला मुख्यमंत्र्यांनी लिखित उत्तर दिले आहे. या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, बृहन्मुंबई  पोलीस आयुक्तालयात  अल्पवयीन मुलांना , तरुणींना भुलवून पाळवणार्‍या टोळीबाबत कोणताही गुन्हा नोंद नाही. मात्र त्याबरोबरच जानेवारी 2016 ते जून 2016 याकाळात 2881 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर जानेवारी 2017 ते जून 2017 या वर्षात 2965 मुली बेपत्ता झाल्या असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

राज्यात अल्पवयीन आणि हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी व त्यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठी अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. 18 वर्षांखालील हरवलेल्या मुला- मुलींच्या तपासासाठी स्वतंत्र पथकाद्वारे शोधमोहीम, समाजात प्रबोधनात्मक जनजागृती करण्याबरोबरच हरवलेल्या व्यक्तींची माहिती पोलिसांच्या गॅझेटमध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे. बेपत्ता बालकांचा शोध घेण्यासाठी जुलै 2015 ते 2017 या कालावधीत ऑपरेशन मुस्कान आणि स्माईलअंतर्गत बेपत्ता नोंद असलेल्या बालकांपैकी 1613 बालकांचा शोध घेतला गेला. तर यावर्षी 645 बालकांचा शोध लावण्यात संबंधित पथकाला यश आले आहे.