Tue, Jul 07, 2020 09:12होमपेज › Vidarbha ›  पहा; साप मुंगसाच्या लढाईचा थरार! (video)        

 पहा; साप मुंगसाच्या लढाईचा थरार! (video)

Last Updated: Dec 03 2019 9:41AM
उमरखेड (यवतमाळ) : प्रतिनिधी  

सापाच्या नावाने भल्याभल्यांना कापरे भरतात अशातच चवताळलेला नाग समोर आला. अन, तोही मुंगसाशी दोन हात करताना, हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर जिवाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. असा थरार पाहायला मिळणे दुर्मिळच, पण हा थरार उमरखेड तालुक्यातील जेवली मोरचंडी  रस्त्यावर नागरिकांनी अनुभवला.

हा थरार काहीजणांनी आपल्या कॅमेरा देखील टिपला. साप मुंगसाचे हाडवैर सर्वश्रुत आहे. हे दोघे समोर आले म्हणजे लढाई होणारच. अशाच  त्यांच्या लढाईचा अनुभव जेवली मोरचंडी रस्त्यावर ये- जा करणाऱ्या नागरिकांनी दिवसाढवळ्या अनुभवला. अचानक झुडूपातून साप व मुंगूस रस्त्याच्यामधोमध बाहेर आले आणि भररस्त्यात त्यांची लढाई झाली. मुंगसाने सापाला आपल्या जबड्यात पकडले. यामुळे सापाला काही सुटका करून घेता येईना. पण सापाचा प्रतिकार सुरूच होता. काही मिनिटं रस्त्यावर या दोघांची लढाई झाल्यानंतर सापाला  तोंडात धरुन मुंगूस झुडूपात गेले.  त्यांच्या या लढाईमुळे रस्त्यावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. काही नागरिकांनी याचे चित्रिकरण देखील केले. ते चांगलेच व्हायरल होत आहे.