Tue, Jun 15, 2021 12:18
वर्धा : तळेगावच्या सत्याग्रही घाटात ‘द बर्निंग ट्रक’

Last Updated: Jun 10 2021 9:51PM

वर्धा : पुढारी वृत्तसेवा

नागपूर ते अमरावती मार्गावरील तळेगावलगतच्या सत्याग्रही घाटामध्ये ट्रकच्या केबिनने अचानक पेट घेतला. त्यामध्ये ट्रकच्या केबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. 

अमरावतीकडून एमएच ४० बीएल १६५३ क्रमांकाचा ट्रक नागपूरकडे जात होता. या ट्रकमध्ये परच्यून पावडर, कपडा गठाण, ड्रम नेण्यात येत होते. सत्याग्रही घाट परिसरात ट्रकच्या केबिनला अचानक आग लागली. 

आग लागल्याचे निदर्शनास येताच ट्रक चालकाने ट्रक थांबवून बाहेर उडी घेतली. याबाबतची माहिती मिळताच तळेगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार आशिष गजभिये, पोलिस कर्मचारी वैलास माहुरे, श्याम गळहाट यांनी पोलिस कर्मचा-यांसह घटनास्थळ गाठले. आग विझविण्यासाठी वंपनीतून पाण्याचा टँकर बोलाविण्यात आला. 

येथे अग्निशमन दलही आले होते. पोलिस कर्मचा-यांनी धावपळ करत आग विझविण्याचा प्रयत्न केला. जवळपास तासाभराच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यामध्ये ट्रकच्या केबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी नोंद केली.